Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ACB चा मोठा दणका; ५ लाखांची लाच स्वीकारताना महसूल सहाय्यक गजाआड!

mosami kewat by mosami kewat
April 25, 2026
in बातमी, राजकीय
0
नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ACB चा मोठा दणका; ५ लाखांची लाच स्वीकारताना महसूल सहाय्यक गजाआड!
       
Bribery Case : नागपूरातून भ्रष्टाचाराच्या विरोधातील मोठी कारवाई समोर आली असून जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. नरेश साधूरावजी बर्वे (वय ५४), असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून ते महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर-महाल परिसरातील नझुल प्लॉटवरील बांधकामासंदर्भातील अपील अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित होते. हे प्रकरण तक्रारदाराच्या बाजूने निकाली काढण्यासाठी बर्वे यांनी तब्बल ५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. (Bribery Case)

तक्रारदाराने याबाबत ACBकडे धाव घेतल्यानंतर १७ आणि २० एप्रिल रोजी पडताळणी करण्यात आली. त्यात लाचेची मागणी होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ACBने सापळा रचला. शुक्रवारी रात्री नंदनवन परिसरात पंचासमक्ष तक्रारदाराने आरोपीला ५ लाखांची रक्कम दिली. ही रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या ACB पथकाने बर्वे यांना तात्काळ ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान आरोपीकडून ५ लाखांची रक्कम जप्त करण्यात आली. या रकमेत काही बनावट नोटांचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या मुद्द्यावरही तपास सुरू आहे. (Bribery Case)

या कारवाईनंतर नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीविरोधात नंदनवन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस निरीक्षक विवेक पडघान यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी काही अधिकारी किंवा मध्यस्थ सहभागी होते का, याचाही तपास ACBकडून केला जात असल्याची माहिती आहे.

Tags: Bribery CasecrimeMaharashtrapolice
Previous Post

Claude Mythos’: भारताच्या बँकिंग आणि आयटी क्षेत्रासमोर अभूतपूर्व संकट?

Next Post

दमोह: दलित नवरदेवाला घोड्यावरून खाली खेचून बेदम मारहाण; जातीवाचक शिवीगाळ करत वरात अडवली

Next Post
दमोह: दलित नवरदेवाला घोड्यावरून खाली खेचून बेदम मारहाण; जातीवाचक शिवीगाळ करत वरात अडवली

दमोह: दलित नवरदेवाला घोड्यावरून खाली खेचून बेदम मारहाण; जातीवाचक शिवीगाळ करत वरात अडवली

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वर्धा हिंदी विद्यापीठात दलित, आदिवासी,ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय; ‘एफआयआर आणि कारवाई ब्राह्मणवादी प्रवृत्तीची’ – सुजात आंबेडकर
बातमी

वर्धा हिंदी विद्यापीठात दलित, आदिवासी,ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय; ‘एफआयआर आणि कारवाई ब्राह्मणवादी प्रवृत्तीची’ – सुजात आंबेडकर

by mosami kewat
September 15, 2026
0

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांशी तातडीने संपर्क साधण्याची मागणी! मुंबई : वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील दलित, आदिवासी...

Read moreDetails
प्रशासकीय कार्यकाळ संपल्यानंतर ग्रामसभा बोलावल्याचा आरोप; माहुली जहागीर पोलिसांना ‘वंचित’चा इशारा

प्रशासकीय कार्यकाळ संपल्यानंतर ग्रामसभा बोलावल्याचा आरोप; माहुली जहागीर पोलिसांना ‘वंचित’चा इशारा

September 15, 2026
चांदवड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीला बळ; विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

चांदवड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीला बळ; विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

September 15, 2026
हवामान मोजणारी यंत्रणाच बंद असताना ५५० कोटी खर्चाचा घाट नक्की कुणासाठी ?

हवामान मोजणारी यंत्रणाच बंद असताना ५५० कोटी खर्चाचा घाट नक्की कुणासाठी ?

September 15, 2026
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home