वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मैत्री दिनाच्या पार्श्वभूमीवर एक सूचक ट्विट केले आहे. देशात आणि राज्यात निवडणूकपूर्व राजकीय युती आघाडी करण्याची प्रक्रिया सध्या जोरात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केलेले ट्विट हा भाजप विरोधी आणि समविचारी पक्षांना युतीसाठी दिलेला इशारा मानल्या जात आहे.
‘पुण्यातील सुंदर, हवेशीर #SundayMorning — लोकांना भेटण्यासाठी आणि मैत्री निर्माण करण्यासाठी एक योग्य दिवस. माझे दार उघडे आहे.’ या कॅप्शन सह आपल्या घराचा दरवाजा खुला असलेला फोटो त्यांनी ट्विट केला आहे.
भाजप सोडून इतर पक्षांना आपले दरवाजे कायम खुले असल्याचे वक्तव्य त्यांनी यापूर्वी जाहीर सभा आणि पत्रकार परिषदेतून केले होते.