Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मोदी ‘ब्लॅकमेल’ होत असल्याचा सामाजिक संघटनांचा खळबळजनक आरोप; प्रकाश आंबेडकरांकडे नेतृत्वाची मागणी

mosami kewat by mosami kewat
February 20, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मोदी ‘ब्लॅकमेल’ होत असल्याचा सामाजिक संघटनांचा खळबळजनक आरोप; प्रकाश आंबेडकरांकडे नेतृत्वाची मागणी
       
मुंबई: राजधानी मुंबईत आज विविध सामाजिक संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधींची आज एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. ‘एपस्टीन फाईल्स’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव समोर आल्याचा आरोप आणि त्यातून निर्माण झालेली देशाची सुरक्षा व सार्वभौमत्वापुढील आव्हाने, यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या गंभीर परिस्थितीत आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी करावे, अशी  मागणी यावेळी करण्यात आली.

मुंबई येथील बैठकीत प्रामुख्याने देशाची सार्वभौमत्वता कशी अबाधित राखली जावी आणि एपस्टीन फाईल्समध्ये नाव आल्यामुळे मोदी कशा प्रकारे ‘ब्लॅकमेल’ होऊन हे करार करत आहेत, या सर्व मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच माजी लष्करप्रमुखांच्या पुस्तकात आलेल्या काही धक्कादायक संदर्भांवरून देशाच्या संरक्षण धोरणांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. बाह्य शक्तींच्या दबावाखाली झुकून निर्णय घेतल्यास देशाचे सार्वभौमत्व धोक्यात येऊ शकते, असे मत देखील प्रतिनिधींनी यावेळी मांडला. (Prakash ambedkar)

या महत्त्वाच्या आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर देशातील प्रमुख विरोधी पक्ष उदासीन असल्याची टीका बैठकीत करण्यात आली. जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि देशाला वस्तुस्थिती सांगण्यासाठी आता सामाजिक संघटनांनी कंबर कसली असून, या संघर्षाचे नेतृत्व ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी करावे, अशी विनंती करण्यात आली आहे. (Prakash ambedkar)

या बैठकीत केवळ चर्चा न करता आगामी आंदोलनाची दिशाही निश्चित करण्यात आली आहे. लवकरच या मुद्द्यावरून मोठे जनआंदोलन छेडले जाण्याचे संकेत देण्यात आले आहेत. या महत्त्वपूर्ण बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर, मुंबई प्रदेश प्रवक्ते अंबरसिंह चव्हाण यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: americaDonald TrumpEpstein fileMaharashtramumbainarendra modiPoliticalpoliticsVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

मागासवर्गीयांच्या १५% निधीचा विनियोग न करणाऱ्या ग्रामपंचायतींची चौकशी करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

Next Post

धक्कादायक! नागपूरमध्ये परीक्षेपूर्वीच बारावीचे २ पेपर फुटले, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर व्हॉट्सअॅपवर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडरच्या टंचाईने घेतला तरुणाचा बळी; तिवसा तालुक्यातील हृदयद्रावक घटना
बातमी

Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडरच्या टंचाईने घेतला तरुणाचा बळी; तिवसा तालुक्यातील हृदयद्रावक घटना

by mosami kewat
April 2, 2026
0

Gas Cylinder Shortage : राज्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या टंचाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांवर बसत आहे. वाढती किंमत आणि बुकिंग कालावधीतील वाढ...

Read moreDetails
सिलेंडर टंचाई, महागाई आणि बेरोजगारीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर जोरदार हल्ला

सिलेंडर टंचाई, महागाई आणि बेरोजगारीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर जोरदार हल्ला

April 2, 2026
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने मजुरांना चिरडलं; ६ महिलांचा दुर्दैवी मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने मजुरांना चिरडलं; ६ महिलांचा दुर्दैवी मृत्यू

April 2, 2026
नंगे हाथों से सफाई जातिवादी और अमानवीय – ॲड. प्रकाश आंबेडकर

नंगे हाथों से सफाई जातिवादी और अमानवीय – ॲड. प्रकाश आंबेडकर

April 1, 2026
तृतीयपंथी (पारलिंगी) हक्क, लिंगसमानता आणि लोकशाहीची कसोटी : आंबेडकरी विचारांच्या प्रकाशात कायदे आणि वास्तव

तृतीयपंथी (पारलिंगी) हक्क, लिंगसमानता आणि लोकशाहीची कसोटी : आंबेडकरी विचारांच्या प्रकाशात कायदे आणि वास्तव

April 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home