मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या २०० हून अधिक माध्यमिक शाळा सध्या मुख्याध्यापकांशिवाय सुरू आहेत. तसेच अनेक शाळांमध्ये लिपिक आणि शिपाई पदेही रिक्त असल्याने शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे.
यामुळे शाळेच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी न्यू सायन मनपा माध्यमिक शाळेत दोनदा टॅब चोरीला गेल्याची घटना घडली. तसेच शाळेत ५०० हून अधिक विद्यार्थी असूनही पूर्णवेळ मुख्याध्यापक, लिपिक किंवा शिपाई नसल्याने शिक्षकांवर प्रशासकीय कामांचा अतिरिक्त ताण येत आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. परिषदेच्या मुंबई विभागाचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे. महापालिकेच्या जुन्या ४९ आणि नव्या १९९ माध्यमिक शाळांपैकी सुमारे ९५% शाळांमध्ये पूर्णवेळ मुख्याध्यापक नाहीत.
जुन्या काही शाळा वगळता, उर्वरित आणि सर्व नवीन शाळांमध्ये लिपिक व शिपाई यांची पदे रिक्त आहेत. यामुळे शिक्षकांना अध्यापनासोबतच प्रशासकीय कामेही करावी लागत आहेत. त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे शाळेच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रिक्त असलेल्या मुख्याध्यापकांच्या जागा सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याची प्रक्रिया पुढील दोन आठवड्यांत पूर्ण होईल, असे मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र, लिपिक आणि शिपाई पदांच्या भरतीवर राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने निर्बंध घातल्याने या पदांबाबत महापालिका काहीही करू शकत नाही. त्यामुळे, या महत्त्वाच्या पदांची भरती कधी होणार असा प्रश्न पडत आहे.
Pune : वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने जनता दरबार
पुणे : वंचित बहुजन आघाडी, पुणे शहर कार्यकारिणीच्या वतीने आयोजित जनता दरबार नुकताच पार पडला. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अनिल...
Read moreDetails