मुंबई : डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी दुसऱ्यांदा शपथ घेत आहेत. मात्र, या वेळी पंतप्रधान मोदींना त्यांनी शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण दिलेले नाही. याचे कारण मोदींचा गुन्हेगारी भूतकाळ असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
गोध्रा येथील दंगलीच्या घटनेमुळे त्यांना अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने समन्स बजावला. या संबधित बातमीचा फोटो ॲड. आंबेडकरांनी ट्विट केला आहे आणि या गुन्हेगारी भूतकाळामुळेच मोदींना निमंत्रण नाकारल्याचे त्यांनी म्हटले आहे.