वंचित बहुजन आघाडीचा भाजप आणि काँग्रेसवर निशाणा
मुंबई : आपल्या मुस्लिम बंधू-भगिनींविषयी त्यांनी केलेले द्वेषपूर्ण भाषण आणि जातीय आधारावर मतदान करण्याचे आवाहन त्यांच्या जिंकण्याच्या उदासीनतेबद्दल बरेच काही सांगून जाते. यामुळेच वंचित बहुजन आघाडीने त्यांना द्वेषपूर्ण, जातीयवादी आणि मौत का सौदागर असे नाव का दिले आहे हे सिद्ध होत असल्याचे ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.
काँग्रेस आपल्या जुन्या विधानाची सत्यता तपासण्यात व्यस्त आहे, पण मोदींच्या इस्लामोफोबिक आणि द्वेषपूर्ण भाषणावर गप्प आहे! का? ते भारतीय मुस्लिम बांधवांच्या पाठीमागे उभे राहण्यास घाबरतात का? असा सवाल करत तरीही आपण त्यांच्याकडून अपेक्षा करतो!? असेही त्यामध्ये म्हटले आहे.
या मुद्यांवर वंचित बहुजन आघाडीने लक्ष वेधले
काँग्रेसने अकोल्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य इस्लामोफोबिक उमेदवार यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवाराच्या वडिलांनी बाबरी मशीद पाडण्यासाठी कारसेवक पाठवले होते. तसेच, उमेदवाराने स्वत: अनेक मुस्लिमविरोधी, आरएसएस समर्थक पोस्ट टाकल्या आहेत.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला एकही मुस्लिम उमेदवार देणे जमले नाही, यात ते अपयशी ठरले आहे.
काँग्रेसचे मौन आरएसएस-भाजपच्या भीतीच्या राजकारणाला प्रोत्साहन देत असून, त्यांच्या मौनामुळे मुस्लिमांचा विश्वासघात झाला आहे.
—