पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी पोलीस कर्मचारी यांना मारहाण केल्याप्रकरणी वंचित बहुजन युवा आणि माथाडी कामगार आघाडीच्या वतीने त्यांच्यावर गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी या करिता आज पोलीस उपायुक्त तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगार्डन पोलीस स्टेशन यांना निवेदन दिले.
सदर विषय अत्यंत गंभीर असून दिनांक ५जानेवारी रोजी ससून रुग्णालय पुणे येथे एका कार्यक्रमादरम्यान भारतीय जनता पार्टीचे आमदार सुनील कांबळे यांनी व्यासपीठावरून उतरत असताना सेवेत असलेल्या बंडगार्डन पोलीस स्टेशनचे कर्मचारी शिवाजी सरक हे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना चापट मारली. सदरील घटनेचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर या घटनेची दखल वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार जनरल युनियन वंचित बहुजन युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ घेत सदर घटनेचा निषेध व्यक्त केला तसेच आमदार सुनील कांबळे यांच्यावर मारहाण करणे व पोलीस कर्मचाऱ्याला कर्तव्यापासून परवृत्त करणे या गुन्ह्यानुसार योग्य त्या कलमान अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन दिले.
यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व कामगार जनरल युनियनचे अध्यक्ष विशाल कसबे, वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहराध्यक्ष सोमनाथ पानगावे , माथाडीचे सरचिटणीस ओमकार कांबळे, सचिव अभिजीत बनसोडे, सचिव चंद्रकांत कांबळे, शहर सदस्य सचिन शिंदे, उपाध्यक्ष वडगाव शेरी विधानसभा बाळासाहेब बनसोडे, संघटक पुणे शहर युवा विशाल साळवे, महासचिव संदेश कांबळे , पुणे शहर संघटक रफिक शेख, पुणे शहर प्रवक्ते, पुणे शहर युवा उपाध्यक्ष अजित वाघमारे, पुणे शहर युवा महासचिव शुभम चव्हाण, अरविंद कांबळे, महेंद्र एरलल्लू, मिलिंद बनसोडे,कृष्णा मोरे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते