Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करून हत्या; आरोपीला त्वरित फाशी द्या – वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

mosami kewat by mosami kewat
November 19, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करून हत्या; आरोपीला त्वरित फाशी द्या – वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
       
मालेगाव : डोंगराळे येथील तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीने तीव्र निषेध करत अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

संबंधित आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मालेगाव तालुक्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याला काळिमा फासणारी ही घटना आहे. सरकारने ताबडतोब फास्ट ट्रक कोर्टात ही केस घेऊन आरोपीला शिक्षा द्यावी. पीडित कुटुंबियांचे पुनर्वसन करावे, वंचित बहुजन आघाडी पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठाम उभी आहे. असे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.

दरम्यान, या प्रकरणी अटक करण्यात आलेला नराधम शेखर उर्फ विजय संजय खैरनार (वय २९) असे आरोपीचे नाव असून पोलिस याची कसून चौकशी करत आहेत. आरोपीचे घर सील करण्यात आले आहे. नराधमाने पीडित बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिचा गळा दाबून खून केल्याचे स्पष्ट होत आहे.

या भयानक कृत्याने संपूर्ण परिसर हादरून गेला या धक्कादायक घटनेनंतर महिलांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विविध पक्ष, संघटना, सामाजिक संस्था, तसेच नागरिकांकडून निषेध करण्यात येत आहेत.

दरम्यान, शहरातील तृतीयपंथीयांनी या घटनेचा तीव्र निषेध करत कॅन्डल मार्च काढला, तसेच कुसुंबा-मालेगाव महामार्ग रोखून धरला. त्यांनी सरकारवरही टीका केली. त्यांच्या आंदोलनात ग्रामस्थांनी देखील सहभाग नोंदविला. सलग दुसऱ्या दिवशी गावातील व्यवहार पूर्णपणे बंद होते.

Tags: crimeJusticeMaharashtraMalegaominor girl assault murdermurderpolicepoliticsprotestTransgenderVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

वंचित बहुजन महिला आघाडीची संविधान संम्मान महासभेच्या निमित्ताने ऐरोली विभागीय बैठक संपन्न.

Next Post

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या ताकदीने निवडून द्या : सुजात आंबेडकर

Next Post
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या ताकदीने निवडून द्या : सुजात आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या ताकदीने निवडून द्या : सुजात आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नांदगाव पोडे, विसापूरातील शेतकऱ्यांना दिलासा; वंचितच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कामाला सुरुवात
बातमी

नांदगाव पोडे, विसापूरातील शेतकऱ्यांना दिलासा; वंचितच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कामाला सुरुवात

by mosami kewat
February 28, 2026
0

चंद्रपूर : नांदगाव पोडे व विसापूर हद्दीतील शेतकऱ्यांना गेल्या चार वर्षांपासून WCL कडून सोडण्यात येणाऱ्या वेस्ट वॉटरमुळे मोठ्या समस्यांना सामोरे...

Read moreDetails
औरंगाबादमध्ये जागतिक बौद्ध धम्मपरिषदेचा उत्साह; भिमराव आंबेडकर यांनी केले मार्गदर्शन 

औरंगाबादमध्ये जागतिक बौद्ध धम्मपरिषदेचा उत्साह; भिमराव आंबेडकर यांनी केले मार्गदर्शन 

February 28, 2026
मराठीची नवी परिभाषा: भावनिक साहित्याकडून भौतिक सक्षमीकरणाकडे

मराठीची नवी परिभाषा: भावनिक साहित्याकडून भौतिक सक्षमीकरणाकडे

February 28, 2026
बोलिव्हियामध्ये नोटांनी भरलेले विमान कोसळले, १५ जणांचा मृत्यू: ३० जखमी

बोलिव्हियामध्ये नोटांनी भरलेले विमान कोसळले, १५ जणांचा मृत्यू: ३० जखमी

February 28, 2026
Iran Israel War : इस्त्रायलचा इराणवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला

Iran Israel War : इस्त्रायलचा इराणवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला

February 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home