Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

राजर्षी शाहू जयंती आणि संविधान अमृतमहोत्सवानिमित्त लातूरमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ‎

mosami kewat by mosami kewat
June 28, 2025
in बातमी
0
राजर्षी शाहू जयंती आणि संविधान अमृतमहोत्सवानिमित्त लातूरमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ‎

राजर्षी शाहू जयंती आणि संविधान अमृतमहोत्सवानिमित्त लातूरमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ‎

       

लातूर- देशाचा सुजान नागरिक घडवायचा असेल तर आज धम्माची गरज आहे. जगाची प्रगती ही धम्म विचाराने झाली आहे. जगात जे विज्ञानाने प्रगती केली ती केवळ बुद्ध विचाराने झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बुद्ध विचाराचे आचरण करावे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारत देशाचे संविधान लिहिले.हे संविधान लिहित असताना त्यांच्या डोळ्यासमोर न्याय,स्वातंत्र्य,समता आणि बंधुता होती. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा लातूर(प) च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आहे होते.

त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. बापू गायकवाड यांनी प्रतिपादन केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कोलंबिया विद्यापीठातून उच्च शिक्षण घेऊन आल्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुर येथे बोलावून त्यांचा कोल्हापुरी जरीचा फेटा बांधून आणि केळुस्कर गुरुजींनी मॅट्रिक परीक्षा पास झाल्यानंतर बुद्धांचे चरित्र देऊन त्यांचा सन्मान केला होता, हा इतिहास ध्यानात घेऊन भारतीय बौद्ध महासभेतर्फे विविध परीक्षांमध्ये चांगल्या गुणांनी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि बढती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जात आहे असेही ते शेवटी म्हणाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष व भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा अध्यक्षा आशाताई चिकटे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच पुढील ध्येयासाठी शुभेच्छा दिल्या. भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक डी.एस. नरसिंगे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांना भावी आयुष्यातील आव्हाने यावर सविस्तर मार्गदर्शन केले. अनेक क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या प्रचार व पर्यटन विभागाच्या वतीने संविधान ग्रंथ तसेच सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

जिल्ह्यातील बहुसंख्य अनेक क्षेत्रातील गुणवंतांनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रचार पर्यटन विभाग जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर यांनी तर सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष गौतम बनसोडे यांनी केले. राजर्षी शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून तसेंच भारतीय संविधानाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्य भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा लातूरच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन सिद्धार्थ बुद्ध विहार, सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी, लातूर येथे करण्यात आले होते.

याप्रसंगी जिल्ह्यातील पालकवर्ग व परिसरातील सर्व उपासक- उपासिकांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला. प्रमुख उपस्थिती राज्य संघटिका दैवशाला गायकवाड, कनिष्ठ अभियंता श्याम सुरवसे, दै. एकमतचे उपसंपादक राजहंस कांबळे, प्रा.डॉ. बालाजी गव्हाळे, विहाराचे सचिव प्रकाश कांबळे, वंचितचे रेणापूर तालुका अध्यक्ष आर. के. आचार्य यांची लाभली.

सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धम्मसंस्थेचे जिल्हा सरचिटणीस अभिमन्यू लामतुरे, कोषाध्यक्ष अर्जुन कांबळे, महिला जिल्हा सरचिटणीस वंदनाताई कांबळे, कोषाध्यक्ष मायाताई कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष राजाराम साबळे, महिला जिल्हा उपाध्यक्ष मंगलताई सुरवसे, प्रचार पर्यटन जिल्हा सचिव आनंद डोणेराव, जिल्हा सचिव लक्ष्मण कांबळे, जिल्हा सचिव प्रेमनाथ कांबळे, लातूर तालुकाध्यक्ष अशोक कांबळे,

रेणापूर तालुकाध्यक्ष सचिन खंडागळे, जिल्हा संघटक विलास आल्टे, जिल्हा सचिव देवराव जोगदंडे, जिल्हा सचिव नानासाहेब आवाड, जिल्हा सचिव दत्तात्रय भोसले, जिल्हा कार्यालय सचिव रवींद्र राजेगावकर, जिल्हा हिशोब तपासणी राजाभाऊ उबाळे, शहर संघटक प्रकाश अडसुळे, शहर सचिव अजय गायकवाड, शहर सचिव रेखाताई घोबाळे, शहर सचिव सरिताताई बनसोडे सह संस्थेचे तालुका, जिल्हा, शहर व महिला शाखेचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.


       
Tags: ConstitutionJayantilaturrajarshi shahu maharajStudents
Previous Post

आदित्य बिर्ला कॅपिटल ॲप हॅक: ४३५ ग्राहकांचे ₹१.९५ कोटींचे डिजिटल सोने लंपास

Next Post

खासगी वीज परवान्यांविरोधात प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा: ‘वंचित’ रस्त्यावर उतरणार! ‎

Next Post
खासगी वीज परवान्यांविरोधात प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा: 'वंचित' रस्त्यावर उतरणार! ‎

खासगी वीज परवान्यांविरोधात प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा: 'वंचित' रस्त्यावर उतरणार! ‎

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सायबर भामट्यांचा धुमाकूळ: पुणेकरांना शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ६२ लाखांना गंडवले
Uncategorized

सायबर भामट्यांचा धुमाकूळ: पुणेकरांना शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ६२ लाखांना गंडवले

by mosami kewat
July 18, 2025
0

पुणे : पुण्यात सायबर गुन्हेगारांनी पुन्हा एकदा आपले फासे टाकले आहेत. शेअर बाजारात चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांनी दोघांना तब्बल...

Read moreDetails
समस्त वंचित समूहाला एकत्र येण्याशिवाय गत्यंतर नाही : अंजलीताई आंबेडकर

समस्त वंचित समूहाला एकत्र येण्याशिवाय गत्यंतर नाही : अंजलीताई आंबेडकर

July 18, 2025
बांद्रा येथे तीन मजली चाळ कोसळून मोठी दुर्घटना; १० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

बांद्रा येथे तीन मजली चाळ कोसळून मोठी दुर्घटना; १० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

July 18, 2025
कांदिवली, चारकोप येथे खड्ड्यांमध्ये होड्या सोडून वंचित बहुजन महिला आघाडीचे आंदोलन

‎चारकोप येथे खड्ड्यांमध्ये होड्या सोडून वंचित बहुजन महिला आघाडीचे आंदोलन

July 18, 2025
‎महाराष्ट्रात २० वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनेक अधिकाऱ्यांची पदोन्नती

‎महाराष्ट्रात २० वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनेक अधिकाऱ्यांची पदोन्नती

July 18, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home