Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मो. पैगंबर बिल कायदा भविष्यातील धार्मिक राजकारण खोडून काढेल – ॲड. प्रकाश आंबेडकर 

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 29, 2022
in बातमी
0
मो. पैगंबर बिल कायदा भविष्यातील धार्मिक राजकारण खोडून काढेल – ॲड. प्रकाश आंबेडकर 
0
SHARES
217
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

मुंबई : पैगंबर बिल संसदेत सादर झाले असून ती आता हाऊसची प्रॉपर्टी झाली आहे. तसेच संसदेने अशा प्रकारच्या कायद्याची गरज असल्याचे बोलून दाखवले. अशी ही प्रॉपर्टी कायद्याच्या स्वरूपात नक्की भविष्यातील नागरिकांच्या प्रगतीसाठी आणि सक्षमीकरणासाठी अस्तित्वात येईल आणि अशा प्रकारचे कायदे धार्मिक राजकारण आणि जातीय तेढ निर्माण करून केल्या जाणाऱ्या राजकारणाला आळा घालेल. मुस्लिम समाजाने सक्रिय राजकारणात येऊन स्वतःचा आवाज भारतीय राजकारणात बुलंद केला पाहिजे. निव्वळ पाठिंबा देणारा मतदाता न होता भविष्यातील पिढीसाठी सक्षम उमेदवारदेखील निर्माण केला पाहिजे. अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.

वंचित बहुजन आघाडी संचालित https://paigambarmohammadbill.org/ या वेबसाईट चे उदघाटन देखील याप्रसंगी करण्यात आले.

पैगंबर बिलमधील मसुदा आणि तरतुदी इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेत उपलब्ध आहेत. हा सोहळा साकीनाका येथील दारुल उलूम अली हसन अहले सुन्नत शाळेच्या सभागृहात झाला. तसेच वंचितच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी जोरदार शक्ती प्रदर्शन करत सहारा हॉटेल (कुर्ला) ते अनिस कंपाउंड साकीनाका पर्यंत भव्य रॅली आयोजित केली होती. या रॅलीत जवळपास दीड हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. याप्रसंगी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी लक्षवेधी मुद्दे मांडले. त्या म्हणाल्या, आपण फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे आणि भारतीय संविधानाचे पाईक आहोत. हा कायदा जातीय तंटे किंवा सामाजिक अराजकता माजविणाऱ्या समाज कंटकांची किंवा त्या प्रकारच्या मानसिकतेची पायमल्ली करणारा आहे. या बिलमध्ये तशा प्रकारचे कठोर प्रविधान करून ठेवले आहे. कर्नाटकात चाललेले हिजाब प्रकरण असो किंवा दलित मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न समाजातील कमकुवत घटकांना यामुळे बळकटी येईल. या प्रसंगी मुस्लिम संघटनांचे मान्यवर मौलाना मोहम्मद अशरफ साहब, मौ. सय्यद मो. राशीद अशरफ साहब, मौ. मो. हाशिम अशरफी साहब, मौ. मो. कमर रजा अशरफी साहब, मौ. मो. सय्यद मंजूर अशरफी साहब, वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष गोविंद दळवी, शिस्त पालन समिती आणि राज्य प्रशिक्षण समिती सदस्य महेंद्र रोकडे, मुंबई प्रदेश कमिटीचे अध्यक्ष अबुल हसन खान, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.


       
Tags: Paigambar billPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

“WE ARE ALL EQUAL UNDER THE BLUE SKY”

Next Post

पाच राज्यांतील निवडणुका : उत्तरोत्तर कठीण होत जाणारी प्रश्नपत्रिका!

Next Post
निवडणुकांचा अन्वयार्थ !

पाच राज्यांतील निवडणुका : उत्तरोत्तर कठीण होत जाणारी प्रश्नपत्रिका!

कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ! हुपरीत व्यावसायिकावर ईडीची धडक: १५ तास कसून चौकशी
बातमी

कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ! हुपरीत व्यावसायिकावर ईडीची धडक: १५ तास कसून चौकशी

कोल्हापूर : कोल्हापूर येथील एका व्यावसायिकाच्या घरावर ईडीची धाक पडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आले. भरत लठ्ठे नाव असून ते ...

June 21, 2025
Crime news: धक्कादायक! मुलीवरून चिडवल्याने मित्राकडूनच मित्राची हत्या
बातमी

Crime News: धक्कादायक! मुलीवरून चिडवल्याने मित्राकडूनच मित्राची हत्या

नवी मुंबई : मस्करीची कुस्करी झाली. तुर्भे येथील धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आली. ही घटना ...

June 21, 2025
IBPS, SBI परीक्षांमधील पारदर्शकतेच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा ; ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

IBPS, SBI परीक्षांमधील पारदर्शकतेच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा – प्रकाश आंबेडकर

पुणे : पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बँकिंग क्षेत्रातील परीक्षा घेणाऱ्या संस्था, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल ...

June 21, 2025
Dinkar Balu Patil : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या; प्रकाश आंबेडकर
बातमी

Dinkar Balu Patil : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या; प्रकाश आंबेडकर

नवी मुंबई : वंचित बहुजन आघाडीने पुन्हा एकदा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला महाराष्ट्राचे ओबीसी नेते, माजी खासदार आणि विधानसभेचे विरोधी ...

June 21, 2025
कामगारांच्या ना हरकत प्रमाणपत्रावर ग्रामसेवकांची टाळाटाळ – वंचित बहुजन महिला आघाडीचा कार्यालयावर मोर्चा!
बातमी

कामगारांच्या ना हरकत प्रमाणपत्रावर ग्रामसेवकांची टाळाटाळ – वंचित बहुजन महिला आघाडीचा कार्यालयावर मोर्चा!

चंद्रपूर : बांधकाम कामगारांना 90 दिवसांच्या नोंदणीवर नाहरकत प्रमाणपत्र मिळावे, यासाठी ग्रामसेवकांकडून होणाऱ्या टाळाटाळीविरोधात वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने चंद्रपूर जिल्हा ...

June 20, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क