Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

मोदीच्या कार्यकाळात ईडी सीबीआयचा प्रचंड गैरवापर – ॲड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 24, 2024
in राजकीय
0
मोदीच्या कार्यकाळात ईडी सीबीआयचा प्रचंड गैरवापर – ॲड. प्रकाश आंबेडकर
       
अकोला : केंद्रात सत्तेत बसलेल्या मोदी सरकारने दहा वर्षात फक्त टिंगल टवाळी केली आणि मोठ्या प्रमाणात ईडी आणि सीबीआय या यंत्रणेचा गैरवापर केला असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत केला.

मोदींच्या कार्यकाळात लोकशाहीऐवजी पोलिसीराज्य अस्तित्वात असल्याची दिसत आहे. यंत्रणेचा गैरवापर करून अनेकांना वेटीस धरण्याचे काम या सरकारने केले.विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षात ईडी आणि सीबीआयने कारवाही केलेल्या एका ही आरोपीला शिक्षा झाली नाही. याचा अर्थ केवळ भीती दाखवण्यासाठी मोदी सरकारने लोकशाहीच्या विरोधात जाऊन सत्तेचा गैरवापर केला असे सिद्ध होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ॲड.आंबेडकर म्हणाले की, राम मंदिराच्या उद्घाटनासाठी शंकराचार्यांनी तूर्तास विरोध केला होता. मात्र निवडणुका तोंडावर असल्यामुळे शुभ मुहूर्त न पाहता त्यांनी घाई घाईने मंदिराची उद्घाटन करून टाकले तसेच 400 पार चा नारा देऊन त्यांना संविधान बदलायचे आहे हे स्पष्ट दिसते.नवीन वर्ग आणि सवर्ण जो भाजपाकडे वळला होता या मतदारांचा भ्रमनिराश झाल्यामुळे त्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला आणि त्यामुळे पहिल्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी प्रचंड घसरली. मोदी सरकारच्या विरोधातील राग व्यक्त करण्यासाठी मतदारांनी सरकारच्या विरोधात मतदान करून आपला हक्क बजावून सरकारचा निषेध करावा. शाहू, फुले, आंबेडकर तसेच मानवतावाद स्वीकारणाऱ्या मतदार वर्गावर आता एक जबाबदारी आली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

लोकशाहीच्या नावाखाली जो धिंगाणा मोदींच्या काळात सुरू आहे त्याला कसे थांबवता येईल यासाठी मतदारांनी जागरूक राहून मतदान करावे. या या सर्व प्रक्रियेसाठी वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पर्याय असून मतदारांनी निर्भीडपणे वंचित बहुजन आघाडीचा मतदान करावे अशी आवाहनही त्यांनी केले.

यावेळी पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर, अकोला लोकसभा मिडीया समीती प्रमुख ॲड.नरेंद्र बेलसरे, सह जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विकास सदाशिव उपस्थित होते.

Tags: AkolaLoksabhaParlmentry Election 2024Prakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचित बहुजन आघाडीचा बेलदार समाजात प्रचाराचा झंझावात

Next Post

सोलापुरात आतिश बनसोडे यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

Next Post
सोलापुरात आतिश बनसोडे यांना  वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

सोलापुरात आतिश बनसोडे यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: वंचित बहुजन आघाडी कडून खामगावमध्ये कॅंडल मार्च, CBI तपासाची मागणी
बातमी

आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: वंचित बहुजन आघाडी कडून खामगावमध्ये कॅंडल मार्च, CBI तपासाची मागणी

by mosami kewat
October 2, 2026
0

बुलढाणा : आयआयटी मुंबईच्या एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय...

Read moreDetails
उल्हासनगर महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक पदी वंचित बहुजन आघाडीच्या आशा पवार यांची निवड!

उल्हासनगर महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक पदी वंचित बहुजन आघाडीच्या आशा पवार यांची निवड!

October 2, 2026
साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर

साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर

October 2, 2026
साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

October 2, 2026
महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

October 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home