Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुंबई : गोरेगावमधील ४५ मजली इमारतीला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

mosami kewat by mosami kewat
February 13, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मुंबई : गोरेगावमधील ४५ मजली इमारतीला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली
       

मुंबई: मुंबईच्या उपनगरातील गोरेगाव परिसरात एका ४५ मजली इमारतीला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सकाळी 9.11 वाजता अग्निशमन दलाला माहिती मिळाल्यानंतर 9.25 वाजता आगीला लेव्हल-1 घोषित करण्यात आले. इमारतीच्या नवव्या मजल्यावर लागलेल्या या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून रहिवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. (Mumbai building fire)

​नेमकी घटना काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगावमधील या गगनचुंबी इमारतीच्या ९ व्या मजल्यावर अचानक आग भडकली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने धुराचे लोट इमारतीच्या वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचले. आग लागल्याचे समजताच इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा (Fire Alarm) सक्रिय झाली आणि रहिवाशांनी सुरक्षित स्थळी धाव घेण्यास सुरुवात केली. (Mumbai building fire)

​घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी तातडीने पाण्याचा मारा करत आग विझवण्याचे काम सुरू केले. अनेकांनी जिन्यांचा वापर करून इमारतीबाहेर धाव घेतली, तर अडकलेल्या काही लोकांना अग्निशमन दलाने सुरक्षितपणे बाहेर काढले.

​आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


       
Tags: MaharashtramumbaiMumbai building firepolice
Previous Post

अकोला: आदर्श समाज घडवण्यासाठी बुद्धाचे तत्वज्ञान घराघरात पोहोचवणे गरजेचे – विजय चौरपगार

Next Post

महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल निवडणूक: प्रकाश आंबेडकरांची भूमिका लवकरच स्पष्ट; वकिलांकडून संपूर्ण पॅनेल साठी आग्रह

Next Post
महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल निवडणूक: प्रकाश आंबेडकरांची भूमिका लवकरच स्पष्ट; वकिलांकडून संपूर्ण पॅनेल साठी आग्रह

महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल निवडणूक: प्रकाश आंबेडकरांची भूमिका लवकरच स्पष्ट; वकिलांकडून संपूर्ण पॅनेल साठी आग्रह

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीचा ७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
बातमी

पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीचा ७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

by mosami kewat
March 26, 2026
0

पनवेल : वंचित बहुजन आघाडीच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त पनवेल महानगर व पनवेल तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे...

Read moreDetails
‘वंचित’च्या नगरसेवकाकडून इम्तियाज जलील यांना १ कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस

‘वंचित’च्या नगरसेवकाकडून इम्तियाज जलील यांना १ कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस

March 26, 2026
औरंगाबादमध्ये इंधन खरेदीवर मर्यादा !

औरंगाबादमध्ये इंधन खरेदीवर मर्यादा !

March 26, 2026
आंध्र प्रदेशात भीषण अपघात: बसला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू, २२ प्रवासी जखमी

आंध्र प्रदेशात भीषण अपघात: बसला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू, २२ प्रवासी जखमी

March 26, 2026
नागपूरची ठिणगी !

नागपूरची ठिणगी !

March 26, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home