Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुदखेडमध्ये सुजात आंबेडकरांच्या जाहीर सभेला प्रचंड गर्दी; विकासासाठी ‘वंचित’ला संधी देण्याचे आवाहन

mosami kewat by mosami kewat
November 28, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मुदखेडमध्ये सुजात आंबेडकरांच्या जाहीर सभेला प्रचंड गर्दी; विकासासाठी ‘वंचित’ला संधी देण्याचे आवाहन
       
नांदेड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून (VBA) विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार प्रचार सभांचे आयोजन केले जात आहे. याच मालिकेतील एक महत्त्वपूर्ण सभा मुदखेड नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत पार पडली. या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत उस्फुर्त प्रतिसाद दिला.

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे झालेल्या या जाहीर सभेसाठी परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी सुजात आंबेडकर यांनी यावेळी उपस्थितांना आवाहन केले.

विकासासाठी हक्काचा प्रतिनिधी निवडावा

यावेळी बोलताना सुजात आंबेडकर यांनी नागरिकांना विकासासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. “वंचित बहुजन आघाडी नागरिकांच्या प्रत्येक स्थानिक समस्येवर लक्ष केंद्रित करून ती सोडवण्यासाठी काम करेल. आपले हक्काचे प्रतिनिधी निवडून देण्यासाठी जनतेने प्रस्थापितांना नाकारून वंचित बहुजन आघाडीला एक संधी द्यावी,” असे आवाहन त्यांनी केले.

वंचित बहुजन आघाडीला मत दिल्यास आपल्या भागातील विकासकामे मार्गी लागतील आणि स्थानिक समस्या सोडवण्यासाठी खऱ्या अर्थाने काम करणारा प्रतिनिधी मिळेल, असा विश्वास सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केला.

या जाहीर सभेला वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य अविनाश भोसीकर, नांदेड जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, प्रशांत इंगोले, श्याम कांबळे, आकाश जोंधळे, राहुल सोनसळे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: developmentElectionLocal body electionMaharashtranandedpoliticsSujat AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

‘खाकी वर्दी उतरवण्याची’ धमकी, पोलिसाला सामूहिक मारहाण! नागपुरात भाजप उमेदवाराची गुंडगिरी

Next Post

मोठी बातमी: झेडपी आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय; २०२५ च्या निवडणुकीला स्थगिती नाही!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सातारा जिल्ह्यात धक्कादायक प्रकार; सहावीच्या विद्यार्थिनींकडून दहावीच्या उत्तरपत्रिका तपासल्याचा आरोप
बातमी

सातारा जिल्ह्यात धक्कादायक प्रकार; सहावीच्या विद्यार्थिनींकडून दहावीच्या उत्तरपत्रिका तपासल्याचा आरोप

by mosami kewat
March 12, 2026
0

सातारा : दहावी आणि बारावीच्या पेपरफुटीच्या बातम्या अधूनमधून समोर येत असतात. मात्र आता सातारा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर...

Read moreDetails
OBC क्रिमी लेयर ठरवताना केवळ पालकांचे उत्पन्न निकष ठरणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

OBC क्रिमी लेयर ठरवताना केवळ पालकांचे उत्पन्न निकष ठरणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

March 12, 2026
Bigg Boss 19 Winner: ५० लाख आणि कार अजूनही मिळेना? गौरव खन्नाचा खळबळजनक खुलासा!

Bigg Boss 19 Winner: ५० लाख आणि कार अजूनही मिळेना? गौरव खन्नाचा खळबळजनक खुलासा!

March 12, 2026
खालापूरचा खूनी हल्ला, युक्रांद चळवळ व भारिपसह परिवर्तनवादी पक्ष-२

खालापूरचा खूनी हल्ला, युक्रांद चळवळ व भारिपसह परिवर्तनवादी पक्ष-२

March 12, 2026
इराण युध्दात ट्रम्प तात्या पुन्हा एकदा "चिकन आऊट" होतील काय ?

इराण युध्दात ट्रम्प तात्या पुन्हा एकदा “चिकन आऊट” होतील काय ?

March 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home