Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

बार्टी महासंचालक सुनील वारे यांच्या विरोधात ‘संविधान’ कचऱ्यात सापडल्याने तीव्र संताप; वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे स्टेशन परिसरात धरणे आंदोलन

mosami kewat by mosami kewat
October 8, 2025
in Uncategorized, बातमी, राजकीय, सामाजिक
0
बार्टी महासंचालक सुनील वारे यांच्या विरोधात ‘संविधान’ कचऱ्यात सापडल्याने तीव्र संताप; वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे स्टेशन परिसरात धरणे आंदोलन
       

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत भारताच्या संविधासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके विक्री केली जाते. मात्र, ही पुस्तके नुकतीच कचऱ्यात सापडली आहेत. त्यामुळे बार्टी विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

वंचित बहुजन युवा आघाडीने या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली असून बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी भारतीय संविधानाच्या प्रती, महापुरुषांच्या पुस्तकांची तसेच संविधान प्रस्ताविकेची विटंबना केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात तत्काळ कारवाई करण्याची मागणी करत वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर “सुनील वारे हटाव – बार्टी बचाव” या घोषवाक्याखाली दुपारी २ वाजता समाजकल्याण कार्यालय, आगरकर नगर (पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मागे, पुणे स्टेशन) येथे धरणे आंदोलन करण्यात आले.

संविधान व महापुरुषांचा अपमान तसेच शासकीय मालमत्तेचे नुकसान या गंभीर घटनेविरोधात आंदोलनादरम्यान सुनील वारे यांची तात्काळ हकालपट्टी, निलंबन व बडतर्फीची मागणी आली.

या आंदोलनाचे नेतृत्व सागर आल्हाट (अध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी, पुणे शहर) करणार असून, या प्रसंगी ॲड. अरविंद तायडे (अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, पुणे शहर), अनिता चव्हाण (अध्यक्षा, वंचित बहुजन महिला आघाडी, पुणे शहर), चैतन्य इंगळे (अध्यक्ष, सम्यक विद्यार्थी आंदोलन, पुणे शहर), विशाल कसबे (अध्यक्ष, माथाडी कामगार व ट्रान्सपोर्ट युनियन, पुणे शहर) आणि पद्यश्री साळवे (अध्यक्ष, रेल्वे कामगार आघाडी, पुणे शहर) उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीने सर्व संविधानवादी, बहुजनवादी आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने धरणे आंदोलनात सहभागी होते.


       
Tags: booksConstitutionDr Babasaheb AmbedkarpoliticsprotestVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

वर्धा येथील हिंदी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान: फ्रेशर्स पार्टीत दलित विद्यार्थ्यांना सवर्ण विद्यार्थ्यांकडून मारहाण; घटनेनंतर वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Next Post

गुन्हेगारीमुळे नाशिक हादरले! वंचित बहुजन आघाडीचे पोलीस आयुक्तांना निवेदन; गुन्हेगारांच्या राजकीय ‘आकांवर’ कारवाईची मागणी

Next Post
गुन्हेगारीमुळे नाशिक हादरले! वंचित बहुजन आघाडीचे पोलीस आयुक्तांना निवेदन; गुन्हेगारांच्या राजकीय ‘आकांवर’ कारवाईची मागणी

गुन्हेगारीमुळे नाशिक हादरले! वंचित बहुजन आघाडीचे पोलीस आयुक्तांना निवेदन; गुन्हेगारांच्या राजकीय 'आकांवर' कारवाईची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
IND vs AUS Semifinal : रोमांचक उपांत्य फेरीत भारताची बाजी! जेमिमा १२७, हरमनप्रीत ८९; विश्वविक्रमी विजयासह अंतिम फेरीत प्रवेश.
क्रीडा

IND vs AUS Semifinal : रोमांचक उपांत्य फेरीत भारताची बाजी! जेमिमा १२७, हरमनप्रीत ८९; विश्वविक्रमी विजयासह अंतिम फेरीत प्रवेश.

by mosami kewat
October 31, 2025
0

ICC Women's World Cup 2025 : भारताच्या जेमिमा रॉड्रिग्ज हिच्या शानदार शतकी खेळीमुळे भारतीय महिला क्रिकेट संघाने गुरुवारी नवी मुंबईतील...

Read moreDetails
बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; चौघांवर परभणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; चौघांवर परभणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

October 30, 2025
“नव” उदारमतवादात “जुन्या” उदारमतवादापेक्षा नवीन काय?

“नव” उदारमतवादात “जुन्या” उदारमतवादापेक्षा नवीन काय?

October 30, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त गैरसोय सहन केली जाणार नाही; गैरसोय झालीच तर पालिका अधिकारी यांना ठोकणारच - स्वप्नील जवळगेकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त गैरसोय सहन केली जाणार नाही; गैरसोय झालीच तर पालिका अधिकारी यांना ठोकणारच – स्वप्नील जवळगेकर

October 30, 2025
बीडमध्ये धाडसी बँक दरोडा! पाली येथील कॅनरा बँकेतून 18.5 लाखांची रोकड लंपास; गॅस कटरचा वापर

बीडमध्ये धाडसी बँक दरोडा! पाली येथील कॅनरा बँकेतून 18.5 लाखांची रोकड लंपास; गॅस कटरचा वापर

October 30, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home