अकोला : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता पराग रामकृष्ण गवई मित्रपरिवार, एडवोकेट आकाश भगत मित्रपरिवार व अकोला बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अशोक वाटिका, अकोला येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत 169 रक्तदात्यांनी रक्तदान करून बाबासाहेबांना अभिवादन केले.
या शिबिराला अनेक सामाजिक, कायदेविषयक व पोलिस विभागातील मान्यवरांनी भेट देत उपक्रमाला प्रोत्साहन दिले.
उपस्थितांमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी. जे. वानखडे, वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर, डॉ. प्रा. प्रसन्नजीत गवई, नंदकुमार डोंगरे, प्रमोद देंडवे, गजानन गवई, ॲड. मोतीसिंहजी मोहता, वंदना वासनिक, अधिकारी विद्या देशमुख, सिटी कोतवालीचे पोलीस निरीक्षक संजय गवई,पोलीस निरीक्षक (खदान) मनोज केदारे, तसेच रामकृष्ण गवई, मनोरमा गवई आणि अनेक सामाजिक बांधव उपस्थित होते.
रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग -रक्तदान करणाऱ्यांमध्ये युवकांचा मोठा सहभाग दिसून आला. अनेकांनी आपल्या आयुष्यात प्रथमच रक्तदान करताना “बाबासाहेबांना दिलेली हीच खरी आदरांजली” असल्याचे सांगितले.
रक्तदान करणाऱ्यांमध्ये प्रमुख -राहुल तायडे, राज गावंडे, दीपक तायडे, पंकज दामोदर, अजय वानखडे, यश इंगळे, शुक्लोदन वानखडे, संतोष खंडारे, नकुल जोहार, हर्षल वानखडे, आशिष इंगोले, किशोर बनसोड, तसेच मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.
याशिवाय पोलीस विभागातील राजेश वानखडे व त्यांच्या पत्नी भारती वानखडे यांनी रक्तदान करून विशेष उदाहरण निर्माण केले.
उपक्रमाची यशस्वी पूर्ततारक्तसंकलनाचे काम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अकोला रक्तपेढी यांनी पार पाडले. संपूर्ण कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.





