औरंगाबाद : कर्जबाजारीपणा आणि सततच्या नापिकीमुळे मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटातून जात असून, गेल्या साडेसहा महिन्यांत (१ जानेवारी ते ११ जुलै २०२५) तब्बल ५४३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यापैकी केवळ ३३९ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांनाच शासनाकडून आर्थिक मदत मिळाली आहे, तर अनेक प्रकरणे अजूनही चौकशीच्या फेऱ्यात अडकलेली आहेत.
बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या
या आकडेवारीत बीड जिल्हा सर्वाधिक बाधित ठरला आहे. बीडमध्ये या वर्षात १३६ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. यापैकी ९३ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत, तर १९ अपात्र ठरली असून, २४ प्रकरणे चौकशी व निर्णयासाठी प्रलंबित आहेत.
इतर जिल्ह्यांची स्थिती
बीडनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. येथे ६० प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली, ११ अपात्र ठरली, तर २५ प्रकरणे प्रलंबित आहेत.
इतर जिल्ह्यांची आकडेवारी खालीलप्रमाणे:
1) नांदेड: ७६ आत्महत्या (५३ पात्र, ३ अपात्र, २० प्रलंबित)
2) परभणी: ६५ आत्महत्या (२९ पात्र, १८ अपात्र, १८ प्रलंबित)
3) धाराशिव: ६६ आत्महत्या (४४ पात्र, ९ अपात्र, १३ प्रलंबित)
4) लातूर: ३९ आत्महत्या (२६ पात्र, १३ प्रलंबित)
5) जालना: ३४ आत्महत्या (१८ पात्र, १६ प्रलंबित)
शेतकऱ्यांच्या या वाढत्या आत्महत्या चिंताजनक असून, शासनाने या गंभीर समस्येवर तातडीने आणि परिणामकारक उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होते. अनेक प्रकरणांमध्ये मदतीसाठी लागणारा विलंब आणि अपात्र ठरविल्या जाणाऱ्या प्रकरणांची संख्या पाहता, प्रशासकीय स्तरावरही अधिक पारदर्शकतेची आणि संवेदनशीलताची आवश्यकता आहे.
गोवंडीतील खड्ड्यांवर वंचित महिला आघाडीचा तीव्र विरोध”खड्डे बुजवा, नाहीतर अधिकारी खड्ड्यात!”
गोवंडीतील खड्डेमय रस्त्यांवर व नाल्यांच्या दुर्दशेवर वंचित बहुजन महिला आघाडीचे तीव्र आंदोलन; महापालिकेला इशारा "खड्डे बुजवा नाहीतर अधिकाऱ्यांना खड्ड्यात घाला!"...
Read moreDetails