Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मलकापूर–शिवणी परिसरात पोलीस चौकी व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी; नगरसेविका जयश्री बहादूरकर यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन सादर 

mosami kewat by mosami kewat
September 17, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मलकापूर–शिवणी परिसरात पोलीस चौकी व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी; नगरसेविका जयश्री बहादूरकर यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन सादर 
       

अकोला : मलकापूर–शिवणी, प्रभाग क्रमांक १४ परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मलकापूर येथे स्वतंत्र पोलीस चौकी स्थापन करावी, तसेच परिसरातील महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी नगरसेविका जयश्री महेंद्र बहादूरकर यांनी केली आहे.

यासंदर्भात जयश्री बहादूरकर यांनी (दि.१६) अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मलकापूर–शिवणी परिसर शहराच्या सीमेवर असून या भागाजवळून रेल्वे मार्ग तसेच महामार्ग जात असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने येथे कायमस्वरूपी पोलीस सुविधा उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

परिसरात घरफोडी, चोरी तसेच इतर अनुचित घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता निर्माण होत असल्याने संभाव्य गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

मलकापूर येथे स्वतंत्र पोलीस चौकी स्थापन करण्याची मागणी करण्यात आली असून, आपत्कालीन परिस्थितीत किंवा गुन्हेगारी घटना घडल्यास नागरिकांना तातडीने पोलीस मदत मिळावी, हा यामागील उद्देश असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच प्रमुख प्रवेश व निर्गमन मार्ग, महामार्गाकडे जाणारे रस्ते, रेल्वे मार्गालगतचा परिसर आणि इतर संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. सीसीटीव्ही यंत्रणेमुळे गुन्हेगारी घटनांना प्रतिबंध करण्यास तसेच घटना घडल्यानंतर संबंधित व्यक्तींची ओळख पटविण्यास मदत होऊ शकते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


       
Tags: AkolaCCTVMaharashtraOutpost CCTV CamerasPolitical
Previous Post

नांदेड : जाहीरनाम्यातील वचनपूर्तीला सुरुवात; शिवरत्न जिवाजी महाले पुतळ्यासाठी वंचितच्या सहाही नगरसेवकांचा पुढाकार

Next Post

सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांना आंबेडकर कुटुंबीयांचे अभिवादन

Next Post
सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांना आंबेडकर कुटुंबीयांचे अभिवादन

सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांना आंबेडकर कुटुंबीयांचे अभिवादन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!
बातमी

यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

by mosami kewat
November 5, 2026
0

डॉ. नीरज वाघमारे यांच्या पुढाकारातून बौद्ध एकजुटीचा नवा अध्याय; हजारोंच्या उपस्थितीत सामूहिक वर्षावास सांगता, भंते ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या धम्मदेशनेने श्रोते...

Read moreDetails
दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

November 5, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

November 5, 2026
अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

November 5, 2026
सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले - ॲड. प्रकाश आंबेडकर

सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले – ॲड. प्रकाश आंबेडकर

November 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home