Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मालेगाव: कंत्राटी कामगारांच्या थकीत वेतनासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; मनपा प्रशासनाला दिले निवेदन

mosami kewat by mosami kewat
July 8, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मालेगाव: कंत्राटी कामगारांच्या थकीत वेतनासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; मनपा प्रशासनाला दिले निवेदन
       

मालेगाव : मालेगाव महानगरपालिकेच्या गटार व झाडू कामगारांचा २८ दिवसांचा रखडलेला पगार तातडीने देण्यात यावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रोहिदास दोरगुळकर यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले की, महापालिकेने गटार व झाडू कामासाठी दिग्विजय इंटरप्राइजेस या ठेकेदाराला कंत्राट दिले होते. संबंधित ठेकेदाराची मुदत संपुष्टात आली असली, तरी कामगारांना त्यांच्या २८ दिवसांच्या श्रमाचे वेतन अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे कामगारांवर आर्थिक संकट ओढवले असून, त्यांना तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली.

यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्तांसोबत बैठक घेऊन हा विषय सविस्तर मांडला. त्यावर अतिरिक्त आयुक्त रोहिदास दोरगुळकर यांनी कामगारांचे थकीत वेतन अदा होईपर्यंत दिग्विजय इंटरप्राइजेस या ठेकेदाराला कोणतीही रक्कम अदा केली जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन दिले. तसेच संबंधित कामगारांना त्यांचा थकीत पगार लवकरात लवकर मिळेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक पवार, वरिष्ठ नेते आनंदजी आढाव, शहराध्यक्ष कुणाल पिंपळे, तालुकाध्यक्ष सुनील आहिरे, एकनाथ पगारे, समाधान महिरे, सिद्धार्थ उशिरे, सचिन चव्हाण यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


       
Tags: MaharashtraMalegaoMunicipal CorporationPolitical
Previous Post

आदिवासी पाडा आजही अंधारात; मूलभूत सुविधांसाठी वंचित बहुजन आघाडीचे घणसोली सहायक आयुक्तांना निवेदन, तीव्र आंदोलनाचा इशारा

Next Post

प्रश्नांची मूळ कारणे विसरलेला समाज!

Next Post
प्रश्नांची मूळ कारणे विसरलेला समाज!

प्रश्नांची मूळ कारणे विसरलेला समाज!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट
बातमी

साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

by mosami kewat
October 2, 2026
0

मुंबई : आयआयटी मुंबईतील स्कॉलर विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर त्याच्या न्यायासाठी त्याचे आई-वडील मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत....

Read moreDetails
महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

October 1, 2026
इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

October 1, 2026
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

October 1, 2026
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

September 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home