दिल्ली : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी १७ वर्षांनंतर पूर्ण झाली असून, विशेष एनआयए न्यायालयाने या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. या प्रकरणातील भाजप नेत्या प्रज्ञा ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश असलेल्या सर्व आरोपींची पुरेशा पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
न्यायालयाने मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये एका मशिदीजवळ मोटरसायकलवर ठेवलेल्या स्फोटक उपकरणात स्फोट झाला होता. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता, तर १०० हून अधिक लोक जखमी झाले होते.
देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप: माझ्या मुलाचा खोटा रिपोर्ट तयार केला ; राहुल गांधी, शरद पवार, विजयाबाई सूर्यवंशी यांची टीका
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि वडार समाजाचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा वडार समाजातर्फे पुण्यात भव्य सत्कार करण्यात...
Read moreDetails