पुणे- लाखो रुपये थकित विज बिल असणाऱ्या धनदांडग्या, प्रतिष्ठित थकबाकीदारांचे साधे वीज कनेक्शनही न कापता चार-पाच हजार रुपये थकीत विज बिल असणाऱ्या सर्वसामान्य जनतेचे मात्र वीज मीटर काढून नेणाऱ्या वडगाव धायरी खडकवासला महावितरण विभागातील प्रामाणिक कर्तव्यदक्ष धडाकेबाज अभियंत्यांचे वंचित बहुजन आघाडी तर्फे हार्दिक अभिनंदन व जाहीर सत्कार करण्यात आला, यावेळी महावितरण खडकवासला विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्वसामन्य जनतेचे वीज कनेक्शन न कापण्याचे व ज्यांचे ५०००रु वीज बील आहे त्यांची वीज कापली अशा सर्व वीज धारकांची वीज जोडून देण्यात यावी, यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तासाभरात ज्या थकबाकीदारांची ज्यांची वीज तोडली होती, त्यांची वीज पुन्हा जोडण्यात आली. अशाप्रकारे वंचित बहुजन आघाडी पर्वती मतदारसंघाने आंदोलन यशस्वी करण्यात केले. यावेळी वंचित बहुजन आघाडी पुणे शहर सदस्य ॲड.अरविंद तायडे, प्रबुद्ध भारत व्यवस्थापक संजय धावारे, मा.पुणे जिल्हा पश्चिम उत्तम वनशिव, प्रसिद्धीप्रमुख संजय गायकवाड, पर्वती विधानसभा अध्यक्ष, सुखदेव वाघमारे, पर्वती विधानसभा महासचिव, रागिनीताई कांबळे, भारिप बहुजन महासंघ पुणे जिल्हा मा.उपाध्यक्ष अंबादास ओहाळ, कमलेश चाबुकस्वार उपस्थित होते.