मूर्तिजापूर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर तसेच युवा नेते आदरणीय सुजात आंबेडकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर “एक्सपोज सिरीज” या नावाने अत्यंत अश्लील, अवमानकारक आणि निंदनीय स्वरूपाचे व्हिडिओ फेसबुकवर प्रसारित करण्यात आले आहेत. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या तालुका शाखेतर्फे मूर्तिजापूर ग्रामीण व शहर पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारीत संबंधित व्हिडिओ बनवणाऱ्या आणि प्रसारित करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमे तसेच माहिती तंत्रज्ञान (IT) अधिनियम 1989 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द खपवून घेणार नाही; वंचित बहुजन आघाडी
या वेळी तक्रार दाखल करताना तालुकाध्यक्ष सुनील सरदार, तसवर खान (महासचिव), करण वानखेडे, अक्षय जोगडे, इम्रान शेख, प्रशांत सोलके, सतीश खंडारे, देवानंद जामनिक, सुनील चोहान, सागर चावरे, दीपक खंडारे, अनिल सिरसाठ, विशाल लोडे आणि महेन्द्र तायडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारच्या अपमानास्पद आणि असभ्य कृतींना आळा बसावा यासाठी तातडीने गुन्हा दाखल करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.






