मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांसंदर्भात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज (सोमवार, दि. १५ डिसेंबर २०२५) पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.
या पत्रकार परिषदेत राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत (उदा. महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती) महत्त्वाचे निर्णय, निवडणूक कार्यक्रम आणि तयारीबद्दल आयुक्त माहिती देण्याची शक्यता आहे.
सह्याद्री अतिथिगृह येथे दुपारी ४.०० वाजता पत्रकार परिषदेत होणार आहे. महानगर पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आज निवडणूक आयुक्त जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षांचे नेते आणि नागरिक या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागून आहे, अनेक प्रलंबित निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.






