महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मंगळवार, २९ जुलैपासून पावसाचा जोर कमी होणार असला, तरी पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर २९ व ३० जुलै रोजी मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
पुणे आणि सातारा वगळता, राज्यातील इतर अनेक ठिकाणी पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. मात्र, विदर्भात पावसाचा जोर अजूनही कायम राहणार असून, २९ जुलै ते १ ऑगस्टदरम्यान येथे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विदर्भातील ‘यलो अलर्ट’ असलेली ठिकाणे (२९ जुलै ते १ ऑगस्ट):
- २९ आणि ३० जुलै: वर्धा
- ३० जुलै: अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ
- २९ जुलै ते १ ऑगस्ट: अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरैया, गोंदिया, नागपूर
दरम्यान, उत्तर भारतात मात्र पावसाचे धुमशान सुरूच राहणार आहे. आगामी चार ते पाच दिवसांत राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.