Maharashtra Monsoon : महाराष्ट्रामध्ये पावसाचं पुन्हा एकदा जोरदार आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवार, १४ सप्टेंबर आणि सोमवार, १५ सप्टेंबर रोजी राज्याच्या बहुतांश भागांत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे.
राज्यातील पावसाचा अंदाज
- सिंधुदुर्ग, धुळे, आणि नंदुरबार वगळता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
– सातारा, रत्नागिरी, पुणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी सोमवार, १५ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट असून, उर्वरित जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट लागू आहे.
जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
मराठवाड्यातील महत्त्वाचं मानलं जाणारं जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने या वर्षात पहिल्यांदाच त्याचे सर्व २७ दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या धरणातून १,१३,१८४ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे, ज्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील मका, कपाशी, उडीद, आणि मूग या पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. नद्यांच्या काठी, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आणि भूस्खलन होण्याची शक्यता असलेल्या भागांत जाणे टाळावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल्याने नागरिकांनी सुरक्षित राहावे.
ओबीसी आरक्षणप्रश्नी ओबीसी, भटक्या विमुक्त महासंघाची राज्यव्यापी बैठक संपन्न ; ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित!
औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओबीसी, भटके विमुक्त समाजाच्या आरक्षणावर गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे, या पार्श्वभूमीवर आज...
Read moreDetails