पुणे : आज पुणे आणि सोलापूर विभागाची रेल्वेची बैठक आज पुण्यात पार पडली. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व खासदार उपस्थित होते. यावेळी पुणे रेल्वे स्टेशन आणि पुणे शहरासंबंधीत प्रश्न उपस्थित केले असता बैठकीमध्ये पुणे रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचा मुद्दा मांडण्यात आल्याचे मेधा कुलकर्णी यांनी सांगितले. रेल्वे स्थानकाला थोरला बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली.
रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात चर्चा होत आहे. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, पुणे रेल्वे स्टेशनला थोरला बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे, अशा प्रकारची मागणी अनेक संघटनांनी वेळोवेळी केली आहे. आजच्या बैठकीत मी त्याचा पुनरुचार केला आहे. कुठल्याही रेल्वे स्थानकाचा, विमानतळाचा भारतातील त्याच्या इतिहासाशी कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न असतो.
जेणेकरून नागरिकांनाही आपला दैदिप्यमान इतिहास कळाला पाहिजे. परंतु, पुणे रेल्वे स्टेशन पाहिल्यानंतर असा कुठलाही इतिहास त्यातून प्रतिबिंबित होत नाही. पुणे शहर हे मोठे आहे नावाजलेले आहे राजधानीच्या शहरापेक्षा कमी नाही. शिक्षणाचे माहेरघर आहे, सांस्कृतिक शहर आहे शैक्षणिक शहर आहे, आयटी हब आहे.
त्यामुळे इतिहासाच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा पुणे रेल्वे स्टेशनवर दिसल्या पाहिजेत म्हणून पुणे रेल्वे स्टेशनला थोरला बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केल्याचे मेधा कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
Anil Ambani : येस बँकेला हजारो कोटींचा फटका; अनिल अंबानींसह अनेकांवर आरोपपत्र दाखल
मुंबई : येस बँक फसवणूक प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांनी आपली कारवाई तीव्र केली आहे. सुमारे 2,800 कोटी रुपयांच्या कथित बँक...
Read moreDetails