मुंबई : पालघरसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जालना, वाशिम आणि अकोला जिल्ह्यांनाही पावसाचा मोठा फटका बसला असून, शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक प्रमुख मार्ग बंद झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे, तर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जालन्यात ढगफुटीसदृश पाऊस: शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले
जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात काल सायंकाळ आणि मध्यरात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शेतीत पाणी साचले आहे. तळणी परिसरात पावसाचा जोर इतका होता की, खरीप हंगामातील कपाशी, सोयाबीन, मका यासह इतर पिके पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. नद्या आणि नाल्यांना पूर आल्याने शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास ३ ते ४ तास चाललेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली आहे.
वाशिम जिल्ह्यात पूरस्थिती, वाहतूक ठप्प
वाशिम जिल्ह्यात आज पहाटेपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रिसोड तालुक्यातील शेलू खडसे, वाकद आणि बालखेड परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतात पाण्याचा मोठा प्रवाह शिरला आहे, ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेकडो एकर शेती पाण्याखाली गेल्याने बालखेड ते वाकद गावाचा संपर्क तुटला आहे.
या पावसामुळे रिसोड-मेहकर, करडा-गोभणी, सरपखेड-धोडप बुद्रुक हे प्रमुख मार्ग पूर्णतः बंद झाले असून, वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
संगमनेरमधील पल्लवी गंगावणे प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी
अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यातील इंदिरा नगर येथील पल्लवी सागर गंगावणे यांच्यावर झालेल्या विनयभंग, मारहाण, चोरी आणि बदनामीच्या प्रकरणात संबंधित आरोपींवर...
Read moreDetails