मुंबई – बोधगया येथील ऐतिहासिक महाबोधी महाविहाराचे पूर्ण नियंत्रण भारतीय बौद्ध समाजाकडे देण्याच्या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने २३ जुलै २०२५ रोजी बिहार विधानसभेवर शांतिमार्च काढण्यात येणार आहे.
१९४९ च्या महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा रद्द करणे, महाबोधी मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे द्यावे, या मागणीसाठी हा शांतिमार्च काढण्यात येणार आहे. यापूर्वी २८ जून २०२५ रोजी महाबोधी मंदिरात धरणे आंदोलन करण्यात आले होते, परंतु सरकारकडून कोणतीही सकारात्मक भूमिका घेण्यात आली नाही.
त्यामुळे या ऐतिहासिक बौद्ध वारशाचे रक्षण करण्यासाठी बिहार विधानसभेवर हे शांतिपूर्ण आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव आ. आंबेडकर, ट्रस्टी चेअरमन डॉ. हरीश रावलिया आणि रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन ॲड. सुभाष जानुजाले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. या आंदोलनात देशभरातील बौद्ध अनुयायांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने करण्यात आले आहे.
सोलापुरात आठवले गटाला धक्का; युवा शहर अध्यक्ष सुमित शिवशरण यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश!
सोलापूर : आरपीआय आठवले गटाचे सोलापूरचे युवा शहर अध्यक्ष सुमित शिवशरण यांनी अधिकृतपणे त्यांच्या शेकडो समर्थकांसह वंचित बहुजन आघाडी मध्ये...
Read moreDetails






