पाटना : बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बिहारमध्ये सुरू आहे. महाबोधी बुद्ध विहारच्या मुक्ती व्हावे, बीटी ऍक्ट 1949 रद्द करावा, या मागण्यांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बिहार विधानसभेवर शांतीमार्च आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा पार्श्वभूमीवर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी आज राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली. लालू प्रसाद यादव यांच्या निवासस्थानी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या शिष्टमंडळाची भेट झाली. या भेटीत शांतीपूर्ण आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती करण्यात आली तसेच बीटी कायदा 1949 रद्द करून महाबोधी विहाराच्या संपूर्ण व्यवस्थापनाची सूत्रे बौद्ध समाजाकडे सोपविण्याची मागणीही मांडण्यात आली. यावेळी भन्ते संघ ही उपस्थित होता.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हिएतनाममधील व्यावसायिक हितसंबंधांवर आणि व्यापार करारावर प्रश्नचिन्ह
संजीव चांदोरकरडोनाल्ड ट्रम्प, देशांनी त्यांना हव्या तशा अटींवर व्यापार करारावर सह्या कराव्यात म्हणून त्यांचे हात पिरगळत असतात. वरकरणी असे वाटेल...
Read moreDetails