Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

एकटे किंवा सगळे मिळून लढुया पण, लढण्याची तयारी ठेवा – ॲड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 17, 2024
in राजकीय
0
एकटे किंवा सगळे मिळून लढुया पण, लढण्याची तयारी ठेवा – ॲड. प्रकाश आंबेडकर
       

“भारत जोडो न्याय यात्रा समापन समारोह” सभेत ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा मोदींवर निशाणा !

मुंबई : भारत जोडो न्याय यात्रा समापन समारोह सभेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी हजेरी लावली. एकटे किंवा सगळे मिळून लढूया पण लढण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे मत ॲड. आंबेडकर यांनी व्यक्त केले. मोदी का परिवारवरही त्यांनी जोरदार निशाणा साधला. तसेच मोदी यांनी आधी स्वतःच्या पत्नीसोबत एकत्र रहावे, असा टोलाही आंबेडकर यांनी लगावला.

फ्युचर गेमिंग कंपनी आहे, या कंपनीचा फायदा 200 कोटी आहे, तर 1300 कोटीचे बाँड या कंपनीने कुठून घेतले असा सवाल करत आंबेडकर म्हणाले, मी अशा अनेक कंपन्यांची नावे सांगू शकतो, मग मोदींना या कंपन्यांना सवाल विचारला पाहिजे का नाही. लोकांनी विचारलं पाहिजे. ईडीने या कंपन्यांना विचारलं पाहिजे. पण कुणीच काही बोलत नाही.

मोदी देशाचे पंतप्रधान राहणार नाही. हिंदू धर्मामध्ये कुटुंबाबद्दल आपण प्रसार केला पाहिजे. त्यामुळे मोदींनी आपल्या कुटुंबासोबत राहिलं पाहिजे, व्यक्तिगत मुद्दा आहे. पण या चर्चांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरुवात केली आहे. नॅशनल कल्चरबद्दल तेच बोलले होते, पण आता ते विसरले आहेत. त्यामुळे आता आपणच याचा प्रसार केला पाहिजे,असेही आंबेडकर म्हणाले.

आंबेडकर म्हणाले, सध्या पश्चिम बंगालची वेगळी परिस्थिती आहे. तिकडे ममता बॅनर्जी यांनी स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. ईव्हीएमच्या विरोधात २००४ पासून लढत आहे. मी कायदेशीर लढा ही देत आहे. मशीन ही अमेरिकेमधून येत असते. या मशीनमध्ये जी चीप येते. ती 20 ते 25 रुपयांमध्ये मिळते. त्यामुळे यामध्ये फेरफार केला जाऊ शकतो.

राहुल गांधी यांना माझी विनंती आहे की, ईव्हीएममध्ये फेरफार शक्य आहे, पेपर ट्रेलिंग आणि वोट यात फरक दिसून येत आहे. त्यामुळे सगळ्या विरोधकांनी निवडणूक आयोगाला घेरलं पाहिजे. पेपर ट्रेलिंग होऊ शकतं. राहुल गांधी यांनी आवाहन केलं पाहिजे, आम्ही सगळे तुमच्यासोबत एकत्र येऊ, असेही आंबेडकर यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.


       
Tags: CongressmahavikasaghadimumbaiPrakash AmbedkarRahul GandhiShivaji ParkVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

भारत जोडो न्याय यात्रेच्या समापन महासमारोहाचे निमंत्रण स्वीकारले

Next Post

आंबेडकरांनी दिली राहुल गांधी यांच्या भाषणाला दिशा

Next Post
आंबेडकरांनी दिली राहुल गांधी यांच्या भाषणाला दिशा

आंबेडकरांनी दिली राहुल गांधी यांच्या भाषणाला दिशा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मोठी बातमी! बार्टीमार्फत UPSC मुलाखतीसाठी अनुसूचित जातीच्या उमेदवारांना २५,००० रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर
बातमी

मोठी बातमी! बार्टीमार्फत UPSC मुलाखतीसाठी अनुसूचित जातीच्या उमेदवारांना २५,००० रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर

by mosami kewat
November 18, 2025
0

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी, BARTI) संघ लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा मुलाखत परीक्षा (Civil...

Read moreDetails
निवडणूक रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीचा ‘ईश्वर चिठ्ठी’ पॅटर्न!

निवडणूक रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीचा ‘ईश्वर चिठ्ठी’ पॅटर्न!

November 18, 2025
कोथरूड पोलीस प्रकरण : ‘वंचित बहुजन आघाडी’च्या लढ्याला माध्यमांकडून वगळल्याचा ‘वंचित’चा आरोप; ट्विट करत नाराजी व्यक्त!

कोथरूड पोलीस प्रकरण : ‘वंचित बहुजन आघाडी’च्या लढ्याला माध्यमांकडून वगळल्याचा ‘वंचित’चा आरोप; ट्विट करत नाराजी व्यक्त!

November 17, 2025
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा!

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा!

November 17, 2025
‘बिरसा मुंडा जयंती’ कार्यक्रमाला परवानगी नाकारली! महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात ‘मनुवादी अजेंडा’ चालतोय का?

‘बिरसा मुंडा जयंती’ कार्यक्रमाला परवानगी नाकारली! महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात ‘मनुवादी अजेंडा’ चालतोय का?

November 17, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home