पुणे : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज मुंबई येथे निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. छातीत संसर्ग झाल्याने त्यांना शनिवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले. त्यांचा पुत्र आनंद भोसले यांनी ही माहिती दिली.
आशा भोसले यांचे पार्थिव उद्या सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत लोअर परळ येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आशा भोसले यांनी हिंदीसह विविध भाषांमध्ये गायन केले आहे. त्यांच्या निधनाची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली.





