नवी दिल्ली : आज सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. सुनावणी सुरू असताना एका वकिलाने थेट सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोर्टाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करत या वकिलाला रोखले आणि कोर्टाबाहेर काढले.
प्राथमिक माहितीनुसार, या वकिलाने सुनावणी सुरू असताना मंचाजवळ जाऊन बूट काढून फेकण्याचा प्रयत्न केला. त्याला वेळीच अडवण्यात आले. या दरम्यान तो वकील जोरजोरात आरडाओरडा करत होता आणि   “सनातनचा अपमान सहन करणार नाही!” असे बोलला. (Bhushan Gavai)
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी खजुराहो येथील भगवान विष्णूंच्या नुकसानग्रस्त मूर्तीच्या पुनर्स्थापनेसंबंधी एका जुन्या याचिकेवर सरन्यायाधीश गवई यांनी केलेल्या एका टिप्पणीमुळे हा वाद उफाळून आला आहे.
सरन्यायाधीश गवई कथितरित्या म्हणाले होते की, “जा, देवांनाच काहीतरी करायला सांग. तू म्हणतोस तू भगवान विष्णूंचा कट्टर भक्त आहेस, तर जा आणि आता प्रार्थना करं. हे एक पुरातत्व स्थळ आहे. ASI आदींची अनुमती आवश्यक आहे. क्षमा करा.” या वक्तव्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. (Bhushan Gavai)
शांतता राखून गवई म्हणाले:
’आम्ही विचलित होत नाही’ कोर्टात इतका मोठा गदारोळ होत असतानाही सरन्यायाधीश गवई शांत होते. या प्रकारानंतर ते म्हणाले, “अशा प्रकारांनी आम्ही विचलित होत नाही. तुम्ही तुमचा युक्तीवाद सुरु ठेवा.”
सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मात्र, ‘बूट फेकल्याच्या’ घटनेचा इन्कार केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कोर्टात एका व्यक्तीने आरडाओरडा केला, त्याला आम्ही बाहेर काढले. (Bhushan Gavai)
’मी सर्व धर्मांचा सन्मान करतो’ – सरन्यायाधीश गवईंची भूमिका
वाद वाढल्यानंतर सरन्यायाधीशांनी आपल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरणही दिले होते. ते म्हणाले होते की, त्यांच्या टिप्पणीला सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले. कोणीतरी मला सांगितले की, माझ्या टिप्पणीला सोशल मीडियावर एका खास पद्धतीने सादर केले जात आहे. मी सर्व धर्मांचा सन्मान करतो, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
IND vs AUS Semifinal : रोमांचक उपांत्य फेरीत भारताची बाजी! जेमिमा १२७, हरमनप्रीत ८९; विश्वविक्रमी विजयासह अंतिम फेरीत प्रवेश.
ICC Women's World Cup 2025 : भारताच्या जेमिमा रॉड्रिग्ज हिच्या शानदार शतकी खेळीमुळे भारतीय महिला क्रिकेट संघाने गुरुवारी नवी मुंबईतील...
Read moreDetails 
			

 
							




