नाशिक : लासलगाव टाकळी येथे मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली. जातीयवादी मानसिकतेतून उच्च वर्गीय मुलीसोबत प्रेम प्रकरण असल्या कारणाने वाल्मिकी समाज्याच्या कुंदन चावरिया या तरुणाची हत्या करण्यात आली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुर्डे आणि पदाधिकारी यांनी पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. आणि नातेवाईकांना घेऊन स्थानिक पोलीस स्टेशन गाठले.
पोलिसांनी तपास लोहमार्ग पोलीस स्टेशन मनमाड यांच्या कडे वर्ग केला आहे. या प्रकरणात सुरवातीला 307 हे कलम होते परंतु मृत्यू नंतर 103 व 325 कलम एफआयआरमध्ये दाखल होतील, असे पोलिसांनी माहिती देतांना सांगितले.
पीडित कुटुंबियांच्या सोबत वंचित बहुजन आघाडी कायम सोबत राहील व पोलिसांनी कसूर केल्यास रस्त्यावर उतरू असे प्रतिपादन माध्यमाशी बोलतांना जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी केले.
वसई-विरार महानगरपालिका निवडणूक: उमेदवारांची पहिली ११ प्रभागनिहाय यादी जाहीर
वसई-विरार : आगामी १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या वसई विरार महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले असून, वंचित बहुजन आघाडीने...
Read moreDetails






