Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कोंढाळीतील नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे द्या; वंचित बहुजन आघाडीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

mosami kewat by mosami kewat
February 19, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
कोंढाळीतील नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे द्या; वंचित बहुजन आघाडीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
       
नागपूर : कोंढाळी येथील विकास नगर (प्रभाग क्र. १३) भागात मागील २० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना अद्यापही मालकी हक्काचे पट्टे मिळालेले नाहीत. ही मागणी मार्गी लावण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काटोलचे उपविभागीय अधिकारी चिवंडे यांना नुकतेच निवेदन सादर करण्यात आले.

मागील 20 वर्षापासून नगरपंचायत कोंढाळी अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १३, विकास नगर येथील नागरिक गावठाण हद्दीतील जागेवर गेल्या दोन दशकांपासून वस्ती करून राहत आहेत. आपल्या हक्काच्या जागेचा पट्टा मिळावा यासाठी हे नागरिक अनेक वर्षांपासून शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत, मात्र अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही. या सततच्या दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. (Vanchit bahujan aghadi)

नागरिकांच्या या मूलभूत मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांच्या नेतृत्वाखाली आणि युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध मडके यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले. शासनाने नियमानुसार प्रत्येक पात्र लाभार्थ्याला तातडीने मालकी हक्काचा पट्टा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (Vanchit bahujan aghadi)

या प्रसंगी जिल्हा कार्यालयीन सचिव वैभव येवले, आयटी सेल प्रमुख शुभम वाहने, तालुकाध्यक्ष वसंत मडके, सतीश पाटील, पवन तागडे, जीवन गायकवाड, वाहने सर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: JusticeLand RightsMaharashtranagpurVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

माता भीमाई आणि रमाई यांच्या कष्टामुळेच स्त्रियांचे जीवन स्वाभिमानी : डॉ. रेखा मेश्राम

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज हे ‘विभाजनाचे’ नव्हे, तर ‘ऐक्याचे’ प्रतीक: योगेश साठे

Next Post
छत्रपती शिवाजी महाराज हे ‘विभाजनाचे’ नव्हे, तर ‘ऐक्याचे’ प्रतीक: योगेश साठे

छत्रपती शिवाजी महाराज हे 'विभाजनाचे' नव्हे, तर 'ऐक्याचे' प्रतीक: योगेश साठे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडरच्या टंचाईने घेतला तरुणाचा बळी; तिवसा तालुक्यातील हृदयद्रावक घटना
बातमी

Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडरच्या टंचाईने घेतला तरुणाचा बळी; तिवसा तालुक्यातील हृदयद्रावक घटना

by mosami kewat
April 2, 2026
0

Gas Cylinder Shortage : राज्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या टंचाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांवर बसत आहे. वाढती किंमत आणि बुकिंग कालावधीतील वाढ...

Read moreDetails
सिलेंडर टंचाई, महागाई आणि बेरोजगारीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर जोरदार हल्ला

सिलेंडर टंचाई, महागाई आणि बेरोजगारीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर जोरदार हल्ला

April 2, 2026
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने मजुरांना चिरडलं; ६ महिलांचा दुर्दैवी मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने मजुरांना चिरडलं; ६ महिलांचा दुर्दैवी मृत्यू

April 2, 2026
नंगे हाथों से सफाई जातिवादी और अमानवीय – ॲड. प्रकाश आंबेडकर

नंगे हाथों से सफाई जातिवादी और अमानवीय – ॲड. प्रकाश आंबेडकर

April 1, 2026
तृतीयपंथी (पारलिंगी) हक्क, लिंगसमानता आणि लोकशाहीची कसोटी : आंबेडकरी विचारांच्या प्रकाशात कायदे आणि वास्तव

तृतीयपंथी (पारलिंगी) हक्क, लिंगसमानता आणि लोकशाहीची कसोटी : आंबेडकरी विचारांच्या प्रकाशात कायदे आणि वास्तव

April 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home