Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचितांच्या राजकीय चळवळीचा दस्तऐवज : ज. वि. पवार यांचे प्रतिपादन

mosami kewat by mosami kewat
October 27, 2025
in बातमी
0
वंचितांच्या राजकीय चळवळीचा दस्तऐवज : ज. वि. पवार यांचे प्रतिपादन

वंचितांच्या राजकीय चळवळीचा दस्तऐवज : ज. वि. पवार यांचे प्रतिपादन

       

कोल्हापूर : “कांबळे यांनी निवडलेला कालखंड मोठा, गुंतागुंतीचा आणि वंचितांच्या स्वायत्त राजकारणाला नेस्तनाबूत करणाऱ्या प्रवृत्तींचा आहे. या विषयाला हात घालण्याचे धैर्य त्यांनी दाखवले असून ‘वंचितांचे राजकारण : एक मुक्त चिंतन’ हे पुस्तक म्हणजे वंचितांच्या राजकीय चळवळीचा दस्तऐवज आहे,” असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज. वि. पवार यांनी केले.

ते सिद्धार्थ कांबळे लिखित ‘वंचितांचे राजकारण : एक मुक्त चिंतन’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. शाहू स्मारक येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सीमा शुल्क अधिकारी मदन पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आलोक जत्राटकर, प्रा. डॉ. अमर कांबळे, बार्टीचे संशोधन अधिकारी प्रा. डॉ. संभाजी बिरांजे आणि वंचित आघाडीच्या डॉ. क्रांती सावंत उपस्थित होते.

साहित्यिक ज. वि. पवार पुढे म्हणाले, “पुस्तकाविषयी मी यापेक्षा अधिक काही बोलणार नाही, कारण मी बोललो तर तुम्ही वाचणार नाही. जो समाज वाचतो तोच वाचतो, जो समाज वाचत नाही तो वाचतच नाही.”

लेखक सिद्धार्थ कांबळे यांनी पुस्तकाविषयी बोलताना सांगितले की, “या देशातील वंचितांचे स्वायत्त राजकारण उद्ध्वस्त करण्यासाठी प्रस्थापित राजकारण्यांकडून खेळल्या जाणाऱ्या घाणेरड्या राजकारणाचे अवलोकन म्हणजे हे पुस्तक आहे.”

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीकांत कांबळे यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. स्वागतप्रास्ताविक प्रा. रविराज कदम यांनी केले तर सूत्रसंचालन विजय काळे यांनी केले.


       
Tags: booksKolhapurMaharashtra
Previous Post

एसआरए गैरकारभाराविरोधात पुण्यात जनआंदोलन; प्रकाश आंबेडकरांच्या मोर्चातील कार्यकर्त्यांकडून रुग्णवाहिकेला तात्काळ मार्ग

Next Post

“नव”उदारमतवादात “जुन्या” उदारमतवादापेक्षा नवीन काय ?

Next Post
“नव”उदारमतवादात “जुन्या” उदारमतवादापेक्षा नवीन काय ?

“नव”उदारमतवादात “जुन्या” उदारमतवादापेक्षा नवीन काय ?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राष्ट्रपतींकडे राजीनामा; घरात रोख रक्कम सापडल्याने चौकशी सुरू
Uncategorized

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राष्ट्रपतींकडे राजीनामा; घरात रोख रक्कम सापडल्याने चौकशी सुरू

by mosami kewat
April 10, 2026
0

अलाहाबाद : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी आपल्या पदाचा राष्ट्रपतींकडे तडकाफडकी राजीनामा सोपवला आहे. त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर...

Read moreDetails
राहुरीत वंचितची जोरदार तयारी; डॉ. गौतम चित्ते यांच्याकडून ₹२५ हजारांचा पक्षनिधी

राहुरीत वंचितची जोरदार तयारी; डॉ. गौतम चित्ते यांच्याकडून ₹२५ हजारांचा पक्षनिधी

April 10, 2026
आंबेडकरी चळवळीला मारक आंबेडकरी असंख्य संस्था/ संघटना! 

आंबेडकरी चळवळीला मारक आंबेडकरी असंख्य संस्था/ संघटना! 

April 9, 2026
क्रायसिस ऑफ आयडेंटिटी

क्रायसिस ऑफ आयडेंटिटी

April 9, 2026
राहुरी पोटनिवडणूक : “ही थेट वंचित-भाजप लढत”, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

राहुरी पोटनिवडणूक : “ही थेट वंचित-भाजप लढत”, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

April 9, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home