खोपोली : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणी व कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन खोपोली शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील अनेक तरुणांनी आज मोठ्या उत्साहात वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्ष प्रवेश केला.
हा प्रवेश सोहळा शाखा अध्यक्ष अनुज राजगुरू यांच्या नेतृत्वात, शहर अध्यक्ष सुमित जाधव व महासचिव ऍड. आशिष मणेर यांच्या मार्फत पार पडला. यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या पक्ष प्रवेशामुळे आघाडीची ताकद वाढल्याचे समाधान व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष दिपकभाऊ गायकवाड म्हणाले, “तरुणाईचा वाढता विश्वास पक्षासाठी अभिमानास्पद आहे. आगामी निवडणुकीत पक्षाने दिलेल्या उमेदवाराला विजयी करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी आपल्या प्रभागात पार पाडावी.”
यावेळी शहर अध्यक्ष सुमित जाधव यांनी आश्वासन दिले की, “खोपोलीतील सर्व प्रभागातून मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश घडवून आणत आघाडीतर्फे उमेदवारी लढवण्यासाठी योग्य उमेदवार उभे करण्यात येतील.”
पक्ष प्रवेश सोहळ्यास जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड, शहर अध्यक्ष सुमित जाधव, महासचिव ऍड. आशिष मणेर, कोषाध्यक्ष कुणाल पवार, संघटक संतोष मर्चंडे, उपाध्यक्ष रोहित वाघमारे, अखिल शेख, ज्योती खाडे, सदस्य सिकंदर शेख, प्रशाली मोरे, मिताली वाघमारे, गणेश वाघमारे, खालापूर तालुका अध्यक्ष उत्तम ओव्हाळ, महासचिव पंकज गायकवाड, भगवान खंडागळे, अनुज राजगुरू आदींसह प्रवेशकर्ते तरुण व शहरातील पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.