मुंबई : काळाचौकीसारख्या कामगारवस्त्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या भागात गेल्या काही वर्षांत आलिशान टॉवर उभे राहिले आहेत. परंतु या इमारतींमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामुळे येथील चाळकऱ्यांचे जीवन त्रस्त झाले असून, परिसरातील आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.
परळ, लालबाग, शिवडी आणि काळाचौकी या गिरणगाव भागात परंपरेने सामान्य लोकांची वस्ती आहे. मात्र आधुनिक विकासाच्या लाटेत येथेही उंच इमारतींचा उभार झाला आहे. पण या विकासासोबत निर्माण झालेल्या सांडपाणी समस्येकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने रहिवाशांना अक्षरशः नरकयातना भोगाव्या लागत आहेत.
आंबेवाडी व गंगासिंग चाळ परिसरातील रहिवासी मागील पाच वर्षांपासून या समस्येने हैराण आहेत. चाळीच्या गटारात टॉवरचे सांडपाणी मिसळल्याने पावसाळ्यात घाणीचे पाणी थेट घरात शिरते. दुर्गंधी, मच्छरांचा प्रादुर्भाव आणि श्वसनाचे आजार या संकटामुळे वाढले असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे.
तक्रार केली की पालिकेचे अधिकारी फक्त पाहणी करून निघून जातात; पण पुढील कारवाई मात्र होत नाही. किती दिवस आम्ही या यातना सहन करायच्या? असा सवाल संतप्त चाळकरी विचारत आहेत.
‘किन्नर माँ’ संस्थेचा ११ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती
पुणे : तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक कार्यासाठी कार्यरत असलेल्या "किन्नर माँ एक सामाजिक संस्था" या संस्थेचा ११वा वर्धापन दिन नुकताच...
Read moreDetails