जालना: तिर्थपुरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा प्रकरणी आंबेडकरी कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तिर्थपुरी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणी ठाण्याचे प्रमुख एपीआय साजीद अहेमद यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.
या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी केले, तर यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा कार्याध्यक्ष परमेश्वर खरात यांची होती.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सतीश खरात, सुभाष ससाणे, बळीराम खटके, देविदास कोळे, सुधीर शरणागत, भारत वानखेडे, समाधान तोडके, किशोर तुपे, अतिश वानखेडे, राजु शरणांगत, बाबासाहेब गालफाडे, बाळासाहेब सोनवने, किरण डोके, दयानंद पैठणे, संकेत दांडगे,गौतम पटेकर, संतोष येडे, रामभाऊ गाडेकर, अशोक वानखेडे, आकाश वानखेडे, लक्ष्मण गाडेकर, धम्मा गाडेकर, आकाश वानखेडे,शंकर भालेकर यांच्यासह हजारोंच्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विरोधकांना लकवा मारल्याने ते मोदींचा विरोध करत नाहीत – ॲड. प्रकाश आंबेडकरांची टीका
शरद पवार तर भाजपचे हस्तकच - ॲड. प्रकाश आंबेडकरमुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान...
Read moreDetails