जालना : जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लावण्यात आलेल्या संविधान हत्या दिवस २०२५ या आशयाच्या बॅनरवरून नवा वाद निर्माण झाला आहे. वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन यांनी या बॅनरला तीव्र आक्षेप घेतला असून, तो तातडीने हटवण्याची मागणी केली आहे.
तसेच, संविधान हत्या म्हणजे काय, याचा खुलासा जनतेसमोर करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर मनुवादी विचारसरणीच्या लोकांचा कायम आक्षेप राहिला आहे, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. आता तर हे शासनाकडून पुरस्कृत होताना दिसत आहे. ते तात्काळ थांबले पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे.
संविधानाची हत्या कोणी केली, आणि जर कोणी केली असेल तर त्या देशद्रोह्याला तात्काळ अटक करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या बॅनरमुळे जनतेत गैरसमज पसरत असून, तो तात्काळ कार्यालयासमोरून हटवण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जर हे बॅनर त्वरित हटवले नाही, तर वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ‘जबाब दो आंदोलन’ छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या निवेदनावर वंचित बहुजन आघाडी मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष सुरज सोनवणे, माथाडी कामगार संघटना जिल्हाध्यक्ष प्रकाश पाखरे, युवा उपाध्यक्ष हरिश रत्नपारखे, तालुकाध्यक्ष भानुदास साळवे, उपाध्यक्ष विलास नरवडे, तालुका सचिव गौतम वाघमारे, शिवलाल लोखंडे, अमोल कांबळे, शरद कोळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Jalna : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लावलेले सेंगोल तत्काळ हटवा – वंचित आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा इशारा
जालना : जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लावण्यात आलेल्या संविधान हत्या दिवस २०२५ या आशयाच्या बॅनरवरून नवा वाद निर्माण झाला...
Read moreDetails