Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

इराण-अमेरिका युद्धाचा मोठा परिणाम; भारतात गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ!

mosami kewat by mosami kewat
March 7, 2026
in बातमी, सामाजिक
0
इराण-अमेरिका युद्धाचा मोठा परिणाम; भारतात गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ!
       
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता भारतातही जाणवू लागले आहेत. इराण, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यात मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या तणावपूर्ण लढाईमुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या संघर्षात इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांवर तसेच आखाती देशांमधील काही तेल आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे.

सौदी अरेबिया, दुबई, कतार, कुवेत आणि इराकसारख्या देशांमधील ऊर्जा प्रकल्पांवरही या तणावाचे पडसाद उमटले आहेत.

या परिस्थितीत इराणने एक महत्त्वाचा समुद्री मार्ग बंद केल्याने जागतिक स्तरावर तेल आणि गॅस पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाली आहे. भारताला मोठ्या प्रमाणावर एलपीजी गॅस याच मार्गाने आयात केला जात असल्यामुळे पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यातच काही गॅस प्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांमुळे अनेक देशांनी तात्पुरते उत्पादन कमी किंवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर भारतात एलपीजी गॅसच्या संभाव्य तुटवड्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचा परिणाम म्हणून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 115 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. हे नवे दर आजपासून लागू झाले असून संबंधित कंपन्यांच्या अधिकृत वेबसाइटवरही ते अपडेट करण्यात आले आहेत.

दरम्यान, वाढत्या तणावामुळे पुरवठा व्यवस्थेवर ताण वाढण्याची शक्यता लक्षात घेता केंद्र सरकारने औद्योगिक आणि व्यावसायिक वापरासाठी दिला जाणारा गॅस पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेक गॅस प्लांट्सनी नवीन ऑर्डर स्वीकारणे बंद केले असून पुढील काही दिवसांत व्यावसायिक गॅस पुरवठा पूर्णपणे बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इराण, इस्राईल आणि अमेरिका या युद्धाचे पडसाद आता भारतीय बाजारपेठेत उमटू लागले असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाही बसण्याची चिन्हे दिसत आहेत.

Tags: americaindiaIranIran - Israel warLPGLPG gas price hikeLPG gas silenderMaharashtraVanchit Bahujan Aaghadivbafotindia
Previous Post

सावरकरांनी इंग्रजांची हुजरेगिरी केली, आता मोदी अमेरिकेची करत आहेत; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा घणाघात!

Next Post

मध्यपूर्व युद्ध : केवळ इंधन दरवाढ नव्हे, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा!

Next Post
मध्यपूर्व युद्ध : केवळ इंधन दरवाढ नव्हे, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा!

मध्यपूर्व युद्ध : केवळ इंधन दरवाढ नव्हे, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दुष्काळाच्या नावावर सरकारला लागले भिकेचे डोहाळे, शेतकऱ्यांना मदतीचा आराखडा नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मात्र डल्ला – राजेंद्र पातोडे 
बातमी

दुष्काळाच्या नावावर सरकारला लागले भिकेचे डोहाळे, शेतकऱ्यांना मदतीचा आराखडा नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मात्र डल्ला – राजेंद्र पातोडे 

by mosami kewat
October 17, 2026
0

मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी राज्य सरकारने अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातून एक दिवसाचे वेतन कापण्याचे परिपत्रक काढले...

Read moreDetails
चलो अकोला! धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त अकोल्यात लाखांचा जनसागर उसळणार; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन

चलो अकोला! धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त अकोल्यात लाखांचा जनसागर उसळणार; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन

October 17, 2026
दलित आदिवासी वस्त्यांच्या पाणीप्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचा तोडगा, कृती आराखडा मधील कामे स्थगित करून निधी पाणीपुरवठ्यासाठी वळवा – राजेंद्र पातोडे 

दलित आदिवासी वस्त्यांच्या पाणीप्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचा तोडगा, कृती आराखडा मधील कामे स्थगित करून निधी पाणीपुरवठ्यासाठी वळवा – राजेंद्र पातोडे 

October 17, 2026
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

October 16, 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

October 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home