– डाॅ. केशव मेंढे
भारत आणि इराण या देशाचे ऐतिहासिक संबंध आहेत. दोनही देशामध्ये हडप्पा या भारतीय प्राचीन काळापासून व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण होत राहिली. शतकानुशतकांच्या संपर्कातून भारत आणि इराण यांच्यात एक अनोखी संस्कृती तयार झाली. भारत स्वतंत्र झाल्यानंतही ती टिकून राहिली आहे, परंतु वर्तमान काळातील भाजप,आरएसएस सरकारची आंतरराष्ट्रीय नीती / धोरण हे भारताच्या सार्वभौमत्वाला बाधा आणताना दिसते.
इराणची भारताला निर्यात :-
इराण पूर्वीपासूनच भारताला कच्चे तेल, पेट्रोल, मिथेनाॅल, एलपीजी ला लागणारे घटक द्रव्य, डांबर,बांधकामासाठी लागणारे खनिज इत्यादी वस्तूं मोठ्या प्रमाणात निर्यात करीत आला आणि भारत आयात करीत आला. येवढेच नव्हे तर कच्चे तेल डाॅलरच्या किंमतीत न देता इराण ने ते भारताच्या रुपयात त्याचे मूल्य स्वीकारले.
भारताची इराणला निर्यात:-
भारत इराण ला २५ टक्के बासमती तांदुळ निर्यात करतो. याशिवाय भाजीपाला, मसाले, खाद्यतेल, चहा- काॅफी, डाळी, जेनरिक औषधी,वैद्यकीय उपकरणे, औद्योगिक उपकरणे, कृत्रिम धागे, सेंद्रिय रसायने इत्यादीं वस्तूं इराण भारताकडून आयात करतो. भारताच्या शेतकरी आणि कृषीक्षेत्राच्या उन्नतीसाठी इराण हा संजीवन देणारा देश आहे.
चाबहार बंदर युद्धविषयक केंद्रबिंदू :-
चाबहार बंदर हे इराण च्या आग्नेय भागात, सिस्तान-बलुचिस्तान ओपान आखाताच्या किना-यावर स्थित आहे. हे भारतासाठी वाहतूक मार्गासाठी तसेच भारत- इराण संबंधातील महत्वाचे केंद्र आहे. या बंदराच्या विकासात भारत सहभागी आहे.
इराण हा भारत,पश्चिम आशिया, अफगाणिस्तान आणि मध्य आशिया यांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे. इराण हा जगातील महत्वाचा तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादक देश आहे. इराण भारतासाठी व्यापार आणि उर्जा भागीदार आहे. अफगाणिस्तानात शांतता, स्थैर्य आणि दहशतवादाचा प्रभाव कमी होण्याच्या दृष्टीने भारत आणि इराण या दोघांनीही महत्वाची भूमिका घेतली आहे.
तसेच इराण ने काश्मीर हा भारताचा भाग असल्याचे ठामपणे जगाला सांगितले. इराणशी मैत्रीपूर्ण संबंध टिकवणे,अमेरिकेच्या निर्बंधाचा विचार करणे,त्यावर बोलणे हे बहुआयामी परराष्ट्रीय धोरण मोदी सरकारने राबवले नाही. उलट ज्या अमेरिकेने भारताच्या सार्वभौमत्वाला तडा देण्याचे काम केले त्या ट्रंप च्या इशाऱ्यावर नाचण्याचे काम मोदींनी केले. रुसकडून भारताला कमी भावात मिळणारे पेट्रोल नाकारून प्रधानमंत्री मोदी यांनी ट्रंप यांच्या अधिपत्याखाली राहून अमेरिकेकडून जास्त किंमतीचे पेट्रोल घेण्याचा करार केला. भारताचे इराणबरोबर चांगले संबंध असताना इज्राईल-अमेरिका- इराण युद्धात इराण चे प्रमुख खोमोनी युद्धात मारले गेले तर मोदींनी साधा दुःखवटाही व्यक्त केला नाही.
चाबहार बंदराच्या विकासात भारत सहभागी असताना भारताच्या जहाजावर अमेरिकेने हल्ला केला तरी मोदींनी निषेध नोंदवला नाही. मोदी सरकारचे परराष्ट्रीय धोरण हे भारताच्या स्वतंत्र अस्तित्वाचे अवमूल्यन करणारे आहे. पारंपरिक इराण या मित्र राष्ट्राच्या बाबतीत स्पष्ट भूमिका न घेता तटस्थ राहून बघ्याची भूमिका घेतली.
मोदी सरकार जरी इराण चे महत्व नाकारत असले तरी भारत भारत इराण बरोबर आहे. ते का? हे सांगण्यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत ‘ जनआंदोलन ‘ आयोजित केले ते अनोखे आहे. हे आंदोलन इतर विरोधी राष्ट्रीय पक्षांना लक्ष केंद्रित करायला लावणारे असणार. चर्चा करायला लावणार हे निश्चित.





