मुंबई : इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील वाद अत्यंत चिघळलाय. ,एक महिन्यापूर्वी इस्रायलने लष्करी कारवाई सुरू केल्यापासून गाझामध्ये 10,000 हून अधिक लोक मारले गेले आहेत. तर यात अनेक बालकांचाही समावेश असल्याची माहिती आहे. यामुळे इस्रायलवर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण होत आहे. पण कोणत्याही दबावाला न जुमानता इस्रायलने हमासला जोरदार प्रत्युत्तर देणं सुरूच ठेवलं आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाष्य केले आहे कि, पिडीत आणि अत्याचारी यांच्या संघर्षात मी नेहमी नेहमी पिडीताच्या पाठीशी उभा राहीन आणि जालिमांनी केलेल्या वाईट कृत्यांच्या विरोधात उभा राहीन.
रुग्णालये आणि निर्वासितांच्या छावण्यांवर हवाई हल्ले करण्यात आले आहेत, लहान मुलांसह हजारो लोक मारले गेले आहेत, हजारो लोक बेपत्ता आणि विस्थापित झाले आहेत. पिण्यायोग्य पाणी, वीज इंधन, आणि अन्नपुरवठा खंडित केला आहे. असे त्यांनी म्हटले आहे.
हा पॅलेस्टिनींचा झालेला नरसंहार नाही तर मग काय आहे? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे.