ॲड. प्रकाश आंबेडकर : कोणत्या तोंडाने तुम्ही स्वतःला विश्वगुरू म्हणवता
मुंबई : बांगलादेशने भारतातील ५० न्यायाधीश, न्यायिक अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम रद्द केला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी, आणखी किती अपमान होऊ देणार, कोणत्या तोंडाने तुम्ही स्वतःला जगाचा नेता म्हणता, ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणाचे काय झाले? असा सवालही त्यांनी केला आहे.
पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना ऑगस्टमध्ये ढाका सोडून पळून जावे लागले होते. या नंतर त्या भारतात आल्या होत्या. त्यामुळे भारत आणि बांगलादेशचे संबंध ताणले गेले आणि याचमुळे बांगलादेशच्या अंतरिम सरकारने रविवारी भारतातील ५० न्यायाधीश आणि न्यायिक अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम रद्द केला. फेब्रुवारीमध्ये एक दिवसीय प्रशिक्षण सत्र होणार होते.