बीड : बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा सुव्यवस्थेची स्थिती गंभीर बनली असून, नुकत्याच घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केल्याच्या रागातून एका मित्रानेच दुसऱ्या मित्राच्या हाताची बोटं छाटल्याचा क्रूर प्रकार समोर आला आहे.
नेमकं काय घडलं?
तीन दिवसांपूर्वी शेख अलीम अनिस या तरुणाला चार जणांच्या टोळक्याने कोयता आणि सत्तूरने धमकावल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. हा व्हिडिओ इतरांना का दाखवला, असा जाब मारहाण झालेल्या तरुणाने (नाव उपलब्ध नाही) शेख अलीमला विचारला. यावरून संतापलेल्या अनिसने त्याला गाडीवर बसवून एका अज्ञात ठिकाणी नेले. तिथे त्याला बेदम मारहाण करत त्याच्या हाताची बोटं छाटण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, अनिस हा या घटनेतील मुख्य आरोपी असून तो मारहाण झालेल्या तरुणाचा मित्रच असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पेठ बीड पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून, इतर तीन आरोपी अद्याप फरार आहेत. बीड पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
वाढत्या गुन्हेगारीवर चिंता
बीड जिल्ह्यात अलीकडच्या काळात खून, दरोडे आणि विनयभंगासारख्या गंभीर घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच आता मित्रानेच मित्राची बोटं छाटल्याच्या या घटनेमुळे जिल्ह्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेमुळे बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Malegaon Bomb Blast Case : जर कोणी दोषी नसेल, तर सहा जणांना कोणी मारलं? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सवाल!
मुंबई : 2008 मध्ये घडलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर...
Read moreDetails