Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कष्टकरी महिला आणि कोल्हाटी समाजाचा आवाज सभागृहात ; ‘वंचित’ चा जामखेड पॅटर्न चर्चेत !

mosami kewat by mosami kewat
December 24, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
कष्टकरी महिला आणि कोल्हाटी समाजाचा आवाज सभागृहात ; ‘वंचित’ चा जामखेड पॅटर्न चर्चेत !
       

मुंबई : जामखेड नगर परिषद निवडणुकीत यावेळी जे घडलं, ते नेहमीच्या राजकारणापेक्षा पूर्ण वेगळं आहे. निवडणूक म्हटलं की पैसा, ओळखी, घराणेशाही आणि मोठे पक्ष हे ठरलेलंच असतं. पण जामखेडमध्ये ही सगळी गणितं उलटी पडली आणि सामान्य माणसांचा आवाज थेट सभागृहात पोहोचला.

वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जामखेड नगर परिषदेत पहिल्यांदाच दोन नगरसेवक निवडून आले. विशेष म्हणजे हे दोघेही कुठल्या मोठ्या घराण्यातले नाहीत, ना त्यांच्याकडे पैसा आहे. हे दोघेही इथल्या मातीशी जोडलेले, रोज संघर्ष करणारे लोक आहेत.

प्रभाग क्रमांक ६ (ब) मधून संगीता रामचंद्र भालेराव नगरसेवक झाल्या. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार होते. मोठा खर्च, मोठी यंत्रणा त्यांच्या पाठीशी होती. पण संगीता भालेराव यांच्याकडे फक्त एकच भांडवल होतं, लोकांचा विश्वास.

भालेराव कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. पती रामचंद्र भालेराव वखारीत लाकूड फोडण्याचं काम करतात. घर चालवण्यासाठी मुलांनाही कामं करावी लागतात. अशा परिस्थितीतून आलेल्या संगीता भालेराव यांनी प्रचारात कुठलीही दिखाऊ भाषा केली नाही. “मी तुमच्यासारखीच आहे, तुमच्यातलीच आहे” एवढंच त्या लोकांना सांगत होत्या. १८९५ मतांपैकी जवळपास ५०० मते मिळवत त्यांनी विजय मिळवला.

निवडीनंतर त्या म्हणाल्या की आतापर्यंत घरासाठी, संसारासाठी कष्ट केले, आता पुढची पाच वर्षे जामखेडच्या नागरिकांसाठी काम करणार आहे.

दुसरीकडे, कोल्हाटी समाजातील अ‍ॅड. अरुण आबा जाधव यांनीही जामखेडच्या राजकारणात नवा इतिहास घडवला. ज्या समाजाला आजवर फक्त तमाशा, लावणी आणि उपेक्षा मिळाली, त्या समाजातून आलेल्या अरुण आबांनी नगरसेवक होण्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणलं.

गेली अनेक वर्षे ते कोल्हाटी समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी, हक्कांसाठी काम करत आहेत. रस्त्यावर उतरून आंदोलनं केली, प्रश्न मांडले. आता त्याच प्रश्नांना सभागृहात मांडण्याची संधी त्यांना मिळाली आहे. प्रभाग क्रमांक ६ मधून त्यांनी १८९५ पैकी ७६४ मते घेत दणदणीत विजय मिळवला.

ते म्हणाले की आमच्याकडे पैसा नाही, जातीय राजकारणाचं बळ नाही. पण लोकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. ही संधी आम्हाला वंचित बहुजन आघाडीमुळे मिळाली.

या सगळ्या निकालाने जामखेडमध्ये एक वेगळाच संदेश गेला आहे. आतापर्यंत ज्यांच्या वाट्याला फक्त अपमान, अन्याय आणि दुर्लक्ष आलं, तेच लोक आज लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात बसणार आहेत. हा बदल फक्त राजकीय नाही, तर सामाजिक आहे.

आज उमेदवारी देताना उमेदवार किती श्रीमंत आहे, हे पाहिलं जातं. पण वंचित बहुजन आघाडीने सामान्य कुटुंबातील महिला आणि भटक्या विमुक्त समाजातील कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याचं धाडस दाखवलं. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली “सत्ता ही सामान्यांच्या हातात” हा विचार जामखेडमध्ये प्रत्यक्षात उतरलेला दिसतो.

लाखोंचं आमिष आणि कोटींचा खर्च न करता, फक्त लोकांशी थेट संवाद साधून ही निवडणूक जिंकली गेली. जामखेडच्या जनतेने पैसा नाही, तर काम करणाऱ्या माणसाला निवडलं.

आज संपूर्ण महाराष्ट्रात या ‘जामखेड पॅटर्न’ची चर्चा सुरू आहे. सामान्य माणसालाही सत्तेत स्थान मिळू शकतं, हे जामखेडने दाखवून दिलं आहे.


       
Tags: Arun JadhavElectionJusticeLocal body electionMaharashtraMaharashtra electionmumbaipoliticsVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

मुंबई मनपा युतीबाबत विजय वडेट्टीवारांचे विधान खोटे – जितरत्न पटाईत

Next Post

वंचित बहुजन आघाडी आक्रमक! केज पंचायत समितीच्या कामचुकार कारभाराचा ‘हार’ घालून निषेध

Next Post
वंचित बहुजन आघाडी आक्रमक! केज पंचायत समितीच्या कामचुकार कारभाराचा ‘हार’ घालून निषेध

वंचित बहुजन आघाडी आक्रमक! केज पंचायत समितीच्या कामचुकार कारभाराचा 'हार' घालून निषेध

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
रात्रीच्या अंधारात भाजप कडून पैशांचा पाऊस! सतीश गायकवाडांची लाट पाहून सत्ताधारी भयभीत
बातमी

रात्रीच्या अंधारात भाजप कडून पैशांचा पाऊस! सतीश गायकवाडांची लाट पाहून सत्ताधारी भयभीत

by mosami kewat
January 14, 2026
0

औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रभाग क्रमांक २४ (संजय नगर-मुकुंदवाडी) मध्ये वंचित बहुजन...

Read moreDetails
सुजात आंबेडकरांचा मुंबईत ‘ठाकरें’वर तुफानी हल्ला; मराठी अस्मितेचा केवळ जुमला, यांचा जातीवाद विसरू नका!

सुजात आंबेडकरांचा मुंबईत ‘ठाकरें’वर तुफानी हल्ला; मराठी अस्मितेचा केवळ जुमला, यांचा जातीवाद विसरू नका!

January 13, 2026
अकोल्यात वंचितचा एल्गार! जनसामान्यांचा प्रचंड गर्दी आता परिवर्तनाची वेळ आलीय – प्रभाग ७ मध्ये ॲड. प्रकाश आंबेडकरांची तोफ धडाडली

अकोल्यात वंचितचा एल्गार! जनसामान्यांचा प्रचंड गर्दी आता परिवर्तनाची वेळ आलीय – प्रभाग ७ मध्ये ॲड. प्रकाश आंबेडकरांची तोफ धडाडली

January 13, 2026
वंचित बहुजन आघाडीची अकोल्यात ‘संवाद बैठक’; ॲड. प्रकाश आंबेडकरांनी साधला भीमनगरवासीयांशी संवाद

वंचित बहुजन आघाडीची अकोल्यात ‘संवाद बैठक’; ॲड. प्रकाश आंबेडकरांनी साधला भीमनगरवासीयांशी संवाद

January 13, 2026
शहरांच्या मूलभूत विकासासाठी एक संधी वंचितला द्या!

शहरांच्या मूलभूत विकासासाठी एक संधी वंचितला द्या!

January 13, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home