पुणे : १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी शिवरायांना अभिवादन करून, सर्वे नंबर 237 महात्मा फुलेनगर उरुळी देवाची या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे अतुल बहुले (पुणे शहर, अध्यक्ष व कोल्हापूर निरीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वे नंबर 237 महात्मा फुले नगर उरुळी देवाची येथे भव्य शाखा ओपनिंग करण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शन सर्वजीत बनसोडे (राज्य उपाध्यक्ष) यांनी 27 फेब्रुवारीला होणाऱ्या सत्ता परिवर्तन महासभेला मोठ्या संख्येने जनतेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
बाबासाहेब कांबळे(पुणे शहर,निरीक्षक वंचित बहुजन आघाडी) यांची प्रमुख उपस्थिती होती. तर यावेळी जॉर्ज मदनकर (उपाध्यक्ष पुणे शहर) नवनीत अहिरे प्रसिद्धीप्रमुख (पुणे शहर), संदीप चौधरी प्रसिद्धीप्रमुख (पुणे शहर ), गौरव जाधव प्रसिद्धीप्रमुख (पुणे शहर), पितांबर धिवार (सदस्य पुणे शहर), विश्वास गदादे (अध्यक्ष हडपसर विधानसभा), कोमल ताई शेलार(महिला आघाडी अध्यक्ष हडपसर विधानसभा), मिलिंद सरोदे (उपाध्यक्ष), दिलीप क्षेत्रे (महासचिव), हरिभाऊ वाघमारे (महासचिव), जीवन तात्या भडके (सचिव), सचिन शेलार (संघटक), बबन धिवार (संघटक) आदी पदाधिकारी यावेळी उपस्थिती होते.
या वेळी हडपसर विधानसभेच्या वतीने 25 हजाराचे चेक आणि पाच हजार सहाशे वीस रोख रक्कम स्वरूपात, शाखा महात्मा फुले नगर उरुळी देवाची यांच्या वतीने शाखा अध्यक्ष राजेंद्र कांबळे यांच्या हस्ते सर्वजीत बनसोडे यांच्याकडे सुपूर्त केली.
या कार्यक्रमासाठी राजेंद्र कांबळे, नागेश कुराडे, सचिन कांबळे, सोमनाथ जाधव, शांतआप्पा कांबळे, सोमनाथ जाधव, रत्नदीप वाघमारे, सुमित पवार, लिंबाजी कुंभार, बालाजी कांबळे, दीपक कांबळे, शेषराव सोनकांबळे, विश्वास कांबळे, लहू वाघमारे, शरद अडसुळे, नितीन मोरे, महादेव मोरे, रवी गायकवाड, उत्तम कांबळे, प्रवीण कांबळे, गौतम कांबळे, धनाजी पांढरे, रावसाहेब दिंडे, प्रवीण सोंडारे, सचिन कांबळे, अंकुश शिंदे, बालाजी शिंदे, अर्जुन कांबळे, साहेबराव गायकवाड, अविनाश गायकवाड, रमेश सूर्यवंशी, बाबुराव सूर्यवंशी, शिवकुमार भालेराव, शांताराम वाघमारे, प्रतीक गायकवाड, मनीषा अडसुळे, पूजा अडसुळे, आशा कांबळे, रंजना कांबळे, रुक्मिणी सोडारे, कांचन कांबळे, पंचशील दिंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद सरवदे विधानसभा यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुरज सोनवणे यांनी केले.