सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते व सोलापूर दक्षिण तालुक्याचे महासचिव गोविंद सुर्वे यांचे हृदयविकाराने अलिकडेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पक्षातील कार्यकर्त्यांत शोककळा पसरली आहे.
सोलापूर दौऱ्यावर आले असता वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी गोविंद सुर्वे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी सुर्वे यांच्या योगदानाची आठवण करून देत, “वंचित बहुजन आघाडी आपल्या सोबत आहे” अशी ग्वाही कुटुंबीयांना दिली.
सुर्वे यांच्या जाण्याने वंचित बहुजन आघाडीचे मोठे नुकसान झाले असून, त्यांच्या कार्याची पोकळी दीर्घकाळ भरून निघणार नसल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.