कल्याण : कल्याण पूर्वेकडील एका डॉक्टरच्या क्लिनिकमधील मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी परप्रांतीय आरोपी गोकुळ झा याला कल्याण न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सुनावणीदरम्यान गोकुळ झाने न्यायालयात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.
कोर्टात गोकुळ झाचा गोंधळ
आज, बुधवारी मानपाडा पोलिसांनी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजीत यांना कल्याण न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुनावणी सुरू असताना, गोकुळ झाने त्याच्यावर झालेली कारवाई चुकीची असल्याचा आरोप करत गोंधळ घालायला सुरुवात केली. माझ्या भावाला का ताब्यात घेतले? असा सवाल करत त्याने न्यायाधीशांसमोर आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायाधीशांनी कायदेशीर प्रक्रियेत अडथळा आणल्यास गुन्हा दाखल करण्याची तंबी दिल्यावर तो शांत झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला पोलीस कोठडीत नेले.
काय आहे नेमकं प्रकरण?
कल्याणच्या नांदिवली परिसरातील एका रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणीला गोकुळ झाने बेदम मारहाण केली होती. डॉक्टरांच्या केबिनमध्ये एमआर बसलेले असल्याने, रुग्णांना काही काळ आत पाठवू नये अशी सूचना रिसेप्शनिस्टला मिळाली होती. त्यामुळे तिने गोकुळ झासह इतर रुग्णांना थोडा वेळ थांबण्यास सांगितले. मात्र, गोकुळ झा ऐकत नसल्याने, तिने त्याला आत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतापलेल्या गोकुळने रिसेप्शनिस्टचे केस ओढून तिला मारहाण केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण चांगलेच पेटले.
वेश बदलून पोलिसांना चकवण्याचा प्रयत्न
पोलिसांनी गोकुळ झाविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतरही तो फरार होता. नांदिवली भागात अनेकजण त्याला ओळखत असल्याने, त्याने वेश बदलून पोलिसांना चकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेर अंबरनाथमधील नेवाळी नाका येथे काही मनसे पदाधिकाऱ्यांनी त्याला पकडून मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले.
सराईत गुन्हेगार आहे गोकुळ झा
गोकुळ झा हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. चार दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून तुरुंगातून बाहेर आला होता. त्यानंतर मंगळवारी त्याने रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण केली. त्याच्यावर यापूर्वी हत्यार बाळगणे आणि मारहाण करणे यासारख्या काही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती आहे.
सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात 30 जुलै रोजी सुनावणी!
दिल्ली : शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने संबंधित दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले...
Read moreDetails