Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home अर्थ विषयक

पूल पडला की GDP कमी होतो का? – सुटेड-बुटेड अर्थशास्त्राला ‘जेन-झी’चा बिनधास्त सवाल!

mosami kewat by mosami kewat
September 2, 2026
in अर्थ विषयक, राजकीय, सामाजिक
0
पूल पडला की GDP कमी होतो का? – सुटेड-बुटेड अर्थशास्त्राला ‘जेन-झी’चा बिनधास्त सवाल!
       
– संजीव चांदोरकर 

“रस्ते बांधले, पूल बांधले तर जीडीपी मध्ये भर पडत असेल तर रस्ता वाहून गेला, पूल पडला तर जीडीपी कमी करतात का ? कारण हे तर आपण सतत ऐकत, वाचत असतो. “

शेजारचा दहावीत शिकणारा मुलगा माझ्याशी गप्पा मारत होता. अलीकडेच त्याला टीव्ही वर आणि वर्तमानपत्रात बातम्या असतात त्यात गोडी लागू लागली होती. 

काल, आज त्याने नवीन शब्द ऐकला: जीडीपी! 

त्याला मी जीडीपी ही संज्ञा समजावून देत होतो 

व्हॉव…. याने तर नॅशनल अकाउंटिंग प्रणालीचे कपडे उतरवलेत. 

त्याने विचारलेल्या या व अशा प्रश्नात अजून भर घालता येईल. 

अनेक वर्षांची झाडे असलेली, हजारो, लाखो एकर वरील जंगले कायमची नष्ट केली जातात , ज्यामुळे पर्यावरणाचे गंभीर प्रश्न निर्माण होतात….त्याचे प्रतिबिंब नॅशनल अकाउंटिंग मध्ये कसे पडते. 

जे तरुण शिकून रोजगार, स्वयंरोजगार करून वस्तुमाल सेवांचे उत्पादन करतात त्यावेळी जीडीपी मध्ये भर घालत असतील तर…ज्यावेळी लाखो तरुण बेरोजगार असतात त्यावेळी त्याचे प्रतिबिंब नॅशनल अकाउंटिंग मध्ये कसे पडते 

ही यादी खूप मोठी आहे 

जीडीपी कशी मोजतात, यावर त्या क्षेत्रातील अर्थतज्ञ बरेच काही बोलत, लिहित असतात. त्यात अनेक तांत्रिक बाबी असतात. फाईन. 

पण वरचा प्रश्न तर एवढा कॉमन सेन्सिकल आहे. ज्याला आपल्याला ज्ञान कमी आहे याचे दडपण नसेल तोच असे बेसिक प्रश्न विचारू शकेल. 

जेन झी आणि नंतर येणारी जेन अल्फा…. प्रश्न विचारू लागली आहे आणि भविष्यात राहणार आहे. कारण ते त्यांच्या भाषेत बिनधास्त आहेत. 

ओरिजनल विचार क्षमतेची नसबंदी केल्या गेलेल्या प्रौढ माणसांनी या तरुण पिढीपासून खूप काही शिकले पाहिजे. 

माहिती, ज्ञान येत राहील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनात प्रश्न तयार होणे. त्याहून महत्वाचे ते जाहीरपणे विचारण्याचे धैर्य ठेवणे. त्याची सवय ठेवावी लागते. नाहीतर मेंदूतील ते सेल्स कायमचे मरुन जातात. 

प्रश्न विचारले पाहिजेत विशेषतः अर्थव्यवस्थेबद्दल…. जी तुमच्या आमच्या सर्वांच्या भौतिक राहणीमानावर प्रचंड परिणाम करत असते. 

विशेषतः अर्थव्यवस्थेबद्दल…. कारण या सुटेड मंडळीनी अर्थशास्त्र कळण्यासाठी , अर्थशास्त्रावर बोलण्यासाठी खूप पुस्तक वाचावी लागतात, पीएचडी असण्याची गरज असते असा सामान्य नागरिकांचा ब्रेनवॉश केला आहे.

Tags: EconomicEconomic GrowthEducationgdpmoneystudent
Previous Post

आरक्षणावर हल्ला म्हणजे न्यायावर हल्ला !  ॲड. प्रकाश आंबेडकर 

Next Post

अकोला जिल्ह्यात कृत्रिम पावसाची तांत्रिक शक्यता तपासा; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home