झारखंड : झारखंडच्या राजकारणात ‘दिशोम गुरु’ म्हणून ओळखले जाणारे, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) चे संस्थापक शिबू सोरेन यांचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झालं आहे. दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते आणि जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे वडील असलेल्या शिबू सोरेन यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. “आदरणीय दिशोम गुरुजी आपल्याला सोडून गेले. आज मी शून्य झालो आहे,” असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
शिबू सोरेन यांचं निधन हे झारखंडच्या राजकारणासाठी एक मोठी हानी आहे. एका सामान्य कुटुंबातून येऊन मुख्यमंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा संघर्षमय आणि प्रेरणादायी होता. देशाच्या राजकारणात त्यांनी आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं.
ओबीसी आरक्षणप्रश्नी ओबीसी, भटक्या विमुक्त महासंघाची राज्यव्यापी बैठक संपन्न ; ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित!
औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओबीसी, भटके विमुक्त समाजाच्या आरक्षणावर गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे, या पार्श्वभूमीवर आज...
Read moreDetails