Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पारदर्शक हिशोबामुळे धम्मकार्याला गती मिळेल  : ॲड. एस. के. भंडारे

mosami kewat by mosami kewat
March 17, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पारदर्शक हिशोबामुळे धम्मकार्याला गती मिळेल  : ॲड. एस. के. भंडारे
       

मुंबई : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या बौद्धांच्या शिखर संघटनेच्या कामकाजात पारदर्शकता अत्यावश्यक असून, संस्थेचा हिशोब स्पष्ट व पारदर्शक ठेवल्यास जनतेचा विश्वास अधिक दृढ होऊन धम्मकार्याला गती मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय ऑडिट कमिटीचे प्रमुख व ट्रस्टी ॲड. एस. के. भंडारे यांनी केले.

दि. १५ मार्च २०२६ रोजी दादर येथील डॉ. आंबेडकर भवन येथे केंद्रीय कार्यालयाच्या वतीने आयोजित केंद्रीय ऑडीटर कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यशाळेत देशभरातील विविध राज्यांतील पदाधिकारी, कोषाध्यक्ष, ऑडिटर आणि हिशोब विषयातील जाणकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (Mumbai News)

कार्यशाळेत ॲड. भंडारे यांनी हिशोबाची कार्यपद्धती सविस्तर समजावून सांगत कॅश बुक, पिटी कॅश बुक (कार्यक्रमनिहाय जमा-खर्च), जमा-खर्च अहवाल, भरणा पावत्या, व्हाउचर यांचे लेखन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. उपस्थितांनी विचारलेल्या शंकांचेही त्यांनी समाधान केले.

केंद्रीय ऑडिट सदस्य व राष्ट्रीय सचिव बी. एच. गायकवाड यांनी तिमाही प्रगती अहवाल तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. तर केंद्रीय ऑडिट कमिटीचे उपप्रमुख व राष्ट्रीय सचिव ॲड. डॉ. एस. एस. वानखडे यांनी वार्षिक अहवाल, वैयक्तिक जमाखर्च डायरी यांचे स्वरूप स्पष्ट करून सहभागींची सराव परीक्षा घेतली. केंद्रीय ऑडिट कमिटी सदस्य रुपेश तामगावकर यांनी ऑडिटरने ‘मित्र’ या भूमिकेतून काम करत बँक रिकन्सिलिएशनसह विविध तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन केले. (Mumbai News)

यावेळी ॲड. भंडारे यांनी जाहीर केले की, माजी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळातील जमा-खर्च अहवाल सादर करणे बंधनकारक असून, कोणत्याही अडचणीसाठी त्यांनी ऑडिट कमिटीशी संपर्क साधावा. येत्या तीन महिन्यांत सर्वांनी आपले हिशोब पूर्ण करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच केंद्रीय कमिटीच्या विशेष परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांना ऑडिटर म्हणून सन्मानित करून त्यांची विविध राज्य, जिल्हा व शाखांच्या तिमाही ऑडिटसाठी नियुक्ती केली जाणार असल्याचे सांगितले.

राज्य पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार दरवर्षी एक ऑफलाईन व एक ऑनलाईन ऑडिटर कार्यशाळा घेण्यात येणार असून, प्रत्येक राज्य व महाराष्ट्रातील सात विभागांमध्ये विभागीय हिशोब कार्यशाळा आयोजित करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. या कार्यशाळेत महाराष्ट्र, मुंबई प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, मध्यप्रदेश, तेलंगणा, हैदराबाद आदी राज्यांतील प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन भाषांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. (Mumbai News)

कार्यक्रमाच्या शेवटी मुंबई प्रदेशचे उपाध्यक्ष विलास ढोबळे यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. डॉ. एस. एस. वानखडे यांनी केले, तर राष्ट्रीय कोषाध्यक्ष सी. बी. तेलटुंबडे यांनी आभार प्रदर्शन केले. सरनत्येने कार्यशाळेची सांगता करण्यात आली.


       
Tags: BuddhistFinancialAccountabilityMumbai newsvbaforindia
Previous Post

बिहार राज्यसभा निवडणुकीत कॉंग्रेसची मते फुटली !

Next Post

भीम जयंतीला रात्री १२ पर्यंत परवानगी द्या; वंचित बहुजन आघाडीची शेगाव तहसीलदारांकडे मागणी

Next Post
भीम जयंतीला रात्री १२ पर्यंत परवानगी द्या; वंचित बहुजन आघाडीची शेगाव तहसीलदारांकडे मागणी

भीम जयंतीला रात्री १२ पर्यंत परवानगी द्या; वंचित बहुजन आघाडीची शेगाव तहसीलदारांकडे मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नरेंदर कब मिलेगा सिलेंडर? गॅस टंचाईविरोधात औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन
बातमी

नरेंदर कब मिलेगा सिलेंडर? गॅस टंचाईविरोधात औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन

by mosami kewat
April 6, 2026
0

औरंगाबाद : गॅस सिलेंडर टंचाईच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज औरंगाबाद येथे "नरेंदर कब मिलेगा सिलेंडर" या...

Read moreDetails
‘नरेंदर, कब मिलेंगा गॅस सिलेंडर?’ गॅस टंचाईविरोधात आज राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

‘नरेंदर, कब मिलेंगा गॅस सिलेंडर?’ गॅस टंचाईविरोधात आज राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

April 6, 2026
Bribe Case : मंत्रालयात पुन्हा भ्रष्टाचाराचा स्फोट; ६ लाखांच्या लाचेसह कक्ष अधिकारी अटकेत!

Bribe Case : मंत्रालयात पुन्हा भ्रष्टाचाराचा स्फोट; ६ लाखांच्या लाचेसह कक्ष अधिकारी अटकेत!

April 6, 2026
भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का - ॲड. प्रकाश आंबेडकर

भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का – ॲड. प्रकाश आंबेडकर

April 5, 2026
नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

April 5, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home